Take a fresh look at your lifestyle.

जेनेलिया अन् नाना पाटेकर यांची भुमिका असलेला ‘हा’ चित्रपट चक्क 13 वर्षांनंतर होतोय रिलिज

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | विचार करा की एखाद्या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यावर तो चित्रपट रिलीज व्हायला किती वेळ लागू शकतो? 2 वर्षे, 3 वर्षे किंवा अधिकाधिक 5 वर्षे. मात्र एक सिनेमा असा आहे, ज्याचे शूटींग पूर्ण होऊनही तो रिलीज व्हायला 13 वर्षे लागली. होय, तब्बल 13 वर्षानंतर या सिनेमाला रिलीज डेट मिळालीय. या सिनेमाचे नाव आहे, ‘इट्स माय लाइफ’.
2007 मध्ये या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. मात्र आत्ताकुठे या सिनेमाला रिलीज डेट मिळाली. येत्या 29 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

या 13 वर्षांच्या काळात या सिनेमातील मुख्य कलाकारांचे अख्खे आयुष्य बदलले आहे. चित्रपटाचा लीड अ‍ॅक्टरचा रोल निभावणारा हरमन भावेजा तर आता इंडस्ट्रीतून संन्यास घेऊन बाहेर पडला आहे. लीड अ‍ॅक्टेस असणारी जेनेलिया डिसूजा इंडस्ट्रीत अजूनही अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र दोन मुलांची आई झाली आहे.सिनेमात हरमन बावेजाच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता नाना पाटेकर सध्या फिल्मी दुनियेपासून थोडा दूर, शांत एकांतवासात जगतो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.