Take a fresh look at your lifestyle.

यंदाच्या रक्षाबंधनाला दीदी नसतील…; लता दीदींच्या आठवणीत मोदी झाले भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गेल्या ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले आणि स्वरातील एक सूर कायमचा निखळला. पण लता दीदींची सुरेल कारकीर्द हि आयुष्यभर जपण्याजोगी असल्यामुळे त्या आज शरीररूपी नसल्या तरीही लोकांच्या मनात कायम जिवंत आहेत. दरम्यान लता दीदींच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी हा सोहळा मुंबईत षण्मुखानंद हॉल येथे पार पडला. दरम्यान अनेक दिग्गज मंडळी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देताना सारे भावुक झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भावना आवरू शकले नाहीत.

दरम्यान नरेंद्र मोदी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त होताना म्हणाले कि, ”संगीतासारख्या गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र, सांस्कृतिक दृष्ट्या संगीत ही साधना आणि भावना आहे असं मला वाटतं. अव्यक्त भावनेला व्यक्त करतात ते शब्द, ऊर्जेत चेतनेचा संचार करतो तो नाद आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत. तुम्ही निस्पृह बसले आहात, पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने जीवनात वीररस भरतो.

संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोध देतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रूपामुळे साक्षात पाहिलंय. त्यांचं दर्शन करण्याचा आपल्याला अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने या यज्ञात आहुती दिली आहे.

पुढे म्हणाले कि, एक मोठी बहीण म्हणून लतादीदींनी मला नेहमीच खूप… खूप प्रेम दिलं आहे. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल…? पण जेव्हा यंदा रक्षाबंधन येईल तेव्हा आता दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतोय म्हणून मी आलो. मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. त्यामुळे आदिनाथचा मेसेज आला, तेव्हा मी किती बिझी आहे..? हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या. मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो. कारण लतादीदी जनतेच्या दीदी होत्या.

त्यामुळे हा पुरस्कारही मी संपूर्ण जनतेला अर्पित करतो. मी विचार करोतोय की, दीदीशी माझं नातं कधीपासून किती जुनं आहे..? कदाचित चार साडेचार दशक झाले असतील. सुधीर फडके यांनी माझा परिचय करून दिला तेव्हापासून या कुटुंबासोबत माझे अपार स्नेह आणि आयुष्यातील अगणित घटना जोडल्या गेल्या. माझ्यासाठी लतादीदी सूर साम्राज्ञीसह माझी मोठी बहीण होती. त्याचा मला अभिमान वाटतो. आजच्या या दिवशी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी हा पुरस्कार स्वीकारतो.

रविवारी, २४ एप्रिल २०२२ रोजी हा सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.