Take a fresh look at your lifestyle.

तेलही गेलं आता तूपही जाणार..?; मुख्यमंत्रीपदानंतर सिद्धू पाजी लाफ्टर शोपासून दुरावणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये काँग्रेसचा अक्षरशः दारूण पराभव झाला. यात पंजाबमध्ये आपने मोठं यश मिळवलं ज्यामुळे सर्वत्र काँग्रेसच्या परभवाविषयी सतत चघळणं चालू आहे. दरम्यान पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण पराभवामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काही नशिबी आली नाही. पण आता सिद्धू यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची खुर्ची दूर जाणार आहे. ती म्हणजे कपिल शर्मा शोमधील मनाची खुर्ची.

सोनी एंटरटेनमेंटवरील ‘द कपील शर्मा’ शोमधली मानाची खुर्ची नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून आता काढून घेण्यात येणार आहे. द कपील शर्मा शोचे निर्माते अशोक पंडीत यांनी ट्वीट करत सिद्धू कार्यक्रमात दिसणार नसल्याचं सांगितलं आहे. “ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को-ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये परत दिसू शकत नाहीत”. अशा आशयाचं ट्विट अशोक पंडित यांनी केलं आहे.

हे ट्विट वाचल्यानंतर अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धू यांच्या हातातून राजकारणातील खुर्ची तर गेली आहे. पण आता द कपील शर्मा शोमधली खुर्चीदेखील त्यांनी गमावली आहे. यामुळे सिद्धू कार्यक्रमात दिसणार नाही हे स्पष्ट आहे. यामुळे त्यांचे मात्र खूप नाराज झाले आहेत.