Take a fresh look at your lifestyle.

नवज्योत सिद्धू पाजींचा राजनीतीला निरोप?; ट्विटरवर शेअर केले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे पत्र

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रात हॅप्पी सिद्धू म्हणून ओळखले जाणारे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदर थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नवज्योत सिंह सिद्धू यांचं नाव चर्चेत होतं. खुद्ध सिद्धू यांनाच मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, काँग्रेसमधील वरिष्ठांनी सिद्धूंच्या स्वप्नावर पाणी फेरले.

नवज्योत सिंग सिद्धू यांची ओळख हैप्पी सिद्धू म्हणून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, टीव्ही वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमेडी शो “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज” मध्ये त्यांनी मुख्य परीक्षक अर्थात न्यायाधीशाची भूमिका बजावली होती. याशिवाय त्यांनी ‘पंजाबी चक दे’ या मालिकेतही काम केले आहे. याशिवाय हैप्पी सिद्धू टीव्ही क्षेत्रातील अत्यंत वादग्रस्त आणि लोकप्रिय असणारा रिऍलिटी शो बिग बॉसच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यामूळे क्रिकेटपासून ते कला क्षेत्रापर्यंत आणि राजनीतीपर्यंत त्यांनी उंच झेप घेत यशस्वीरित्या काम केले आहे.