Take a fresh look at your lifestyle.

उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोस? म्हणत नवाजुद्दीन सिद्धीकीवर लहान भाऊ शमासने ओढले ताशेरे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अगदी काहीच दिवसांपूर्वी व्हॅकेशनर बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलच फैलावर घेतलं होत. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत मालदीवमधील सुट्टीचे फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर नवाजने ताशेरे ओढले होते. लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि तुम्ही पैसे उधळत आहात, अरे जरा तरी लाज बाळगा, असे तो म्हणाला होता. पण नवाजचा हा संताप त्याच्या लहान भावाला म्हणजे शमास नवाब सिद्दीकीला काही फारसा रुचला नाही. मग काय त्याने या वक्तव्यावर नवाजलाच उलटे सुनावले आहे. मुख्य म्हणजे मुळात पोस्ट डिलीट करून याबाबतच्या बातम्या तो स्वतःच ट्विटरवर पोस्ट करतोय.

 

शमास नवाब सिद्दीकी हा नवाजुद्दीन सिद्धीकीचा लहान भाऊ आहे. त्याने नवाज सेलिब्रिटींवर भडकल्याची बातमी रिट्विट करत एक ट्विट केले. ‘तुला इतका राग का येतोय भावा? प्रत्येकाला वाटेल तिथे जाण्याचा फिरण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण टॅक्स देतोय आणि देशाला आर्थिक मदत करतोय पण तुझं काय? काय तू सांगू शकतोस, तू सोसायटीसाठी काय केल आहेस. प्लीज, उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोस?’ असे ट्विट शमासने केले.

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला मुलाखत देतेवेळी नवाज सेलिब्रिटींवर बरसला होता. ‘देशातली स्थिती फार खडतर आहे. कोव्हिडच्या केसेस वाढतायत. लोकांना खायला अन्न मिळत नाहीय. देशाची स्थिती अशी असताना, काही कलाकार मालदिवला जाऊन तिथले फोटो पोस्ट करतायत. लोकांकडे खायला पैसे नाहीयत आणि तुम्ही पैसे उडवताय. अरे जरा तरी लाज बाळगा. ‘

हे सगळे कलाकार आपल्या सुट्टीचे फोटो पोस्ट करतायत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. अभिनयावरही ते बोलत नाहीत. कारण यावर बोलले तर ते या सिस्टीममधून बाहेर पडतील. मालदिवचा तमाशा करून ठेवला आहे सगळ्यांनी. तिथे त्यांची पर्यटनादृष्टीने काय सोय आहे मला माहीत नाही. पण तुमची सुट्टी तुमच्यापुरती ठेवा. इकडे कोव्हिड पेशंट वाढतायत. थोडीतरी सहानुभूती दाखवा,’असे तो म्हणाला होता. सध्या मी माझ्या बुधाना या गावी आहे. हेच माझे मालदिव आहे, असेही तो म्हणाला होता.