Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात एनसीबीचा छापा ; ड्रायव्हरला घेतले ताब्यात

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज अँगल समोर आला त्यानंतर एनसीबी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे.त्यातच आता एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा टाकला. एनसीबीच्या एका पथकाने अर्जुन रामपालच्या घर आणि कार्यालयात छापे टाकले. एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या कार चालकाला चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान अर्जुन रामपाल याच्या घरातून एनसीबीच्या हाती काही लागलं की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ एगीसलोस डेमेट्रिएड्स याला अटक केली होती. नुकताच त्याला जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर एनसीबीने त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते  त्याच्याकडून चरस आणि Alprazolam टॅबलेट जप्त करण्यात आल्या होत्या. एनसीबीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, रिया, शौविक, दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडाने ज्यांच्याकडून कथितरित्या ड्रग्ज खरेदी केली होती, त्याच ड्रग्ज पेडलर्सच्या एगीसलोस संपर्कात होता.

एनसीबीने कालच बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली होती. सोबत फिरोज नाडियाडवाला यांनाही एनसीबीने समन पाठवलं होतं. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडियाडवाला यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.  एनसीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.

%d bloggers like this: