हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. दररोजचे नवीन टास्क आणि प्रत्येकाची जिंकायची धडपड हि फार वेगळीच आहे. यामुळे आता या शोची खरी मजा वाढली आहे. असे असताना स्पर्धक कधी भांडतात, कधी प्रेम करतात, कधी दुःख व्यक्त करतात तर कधी आक्रोश. कारण या पूर्ण आठवड्याचा शेवट होतो तो एका एव्हीकेशनने आणि यावेळी बिग बॉसच्या खेळातून आविष्कार दारव्हेकरची एक्झिट झाल्याचे पाहायला मिळाले. खरतर प्रेक्षकांनी पाहताना आविष्कार फारसा दिसत नसला तरीही घरात त्याने बरीच नाती जोडली असल्यामुळे हा निरोप जरा अवघडच होता.
शनिवारी नेहमीप्रमाणे महेश मांजरेकरांची शाळा भरली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी झालं एव्हिक्शन. या चावडीत पाहिल्यादिवशी मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. विशाल निकमला त्याच्या राक्षसी भूमिकेबद्दल खूपच ऐकावं लागलं. यानंतर काल रविवारी बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि अविष्कार दारव्हेकर घरातून बाहेर पडला. खरतर आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये होते आणि याचमुळे कदाचित आविष्कारच ‘बिग बॉसच्या घरातील प्रवास संपुष्टात आला.
आविष्कार हा सुप्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा नातू आहे. त्याने २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आविष्कारने ‘किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी’, ‘ती आणि इतर’, ‘देवा शपथ खोटं सांगेन’, ‘आई तुझा आशीर्वाद’, ‘जुईली’, ‘सुहासिनीची ही सत्वपरीक्षा’, ‘मृत्युपत्र’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य स्नेहा वाघ ही अविष्कारची पूर्वाश्रमीची पत्नी होती. पण महत्वाचे असे कि, कोई एक जाता है तोह दुसरा आता है! असेच झाले इथेही. आविष्कार गेला पण अभिनेत्री निथा शेट्टीने घरात दमदार वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. त्यामुळे आता खेळात आणखीच रंग चढणार एवढं नक्की.