Take a fresh look at your lifestyle.

गायिका नेहा कक्कर लवकरच चढणार बोहल्यावर ; या गायकाशी करणार लग्न

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री आणि गायिका नेहा कक्कर लवकरच लग्न करणार असल्याचे समोर येत आहे. आपल्या मित्राशी रोहनप्रीत सिंहसोबत लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप या नात्याबाबत कोणतीही ऑफिशिअल माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंगच्या हवाल्याने रोहनप्रीत सिंग आणि नेहा लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला त्यांचा विवाह होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’