Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ मला आत्महत्या करावी वाटत होती – नेहा कक्कर..

0

चंदेरी दुनिया । नेहा कक्कर आपल्या चालू कार्यक्रमात अनेकदा रडताना दिसली आहे. आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहा अनेकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपनंतरही ती खूप रडली होती आणि चर्चेचा हिस्सा बनली होती. ती नैराश्येत असल्याचंही तिनं सांगितलं होतं. इंडियन आयडॉल 11 या कार्यक्रमात एका स्पर्धकाशी बोलताना नेहांनं सांगितलं की, नैराश्येच्या त्या काळात मला आत्महत्या करावीशी वाटली होती.

नेहा म्हणाली, ‘माझ्याही आयुष्यात अशी एक वेळ होती जेव्हा मला माझं आयुष्य संपवावं असं वाटत होतं. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. पण हे विचार फक्त या काळापुरते असतात. अशा वेळी तुम्हाला साथ देणारे आई-वडिल, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी यांचा एकदा विचार करायला हवा.’ असं नेहानं एका स्पर्धकाला सांगितलं.

नेहाच्या ब्रेकअपनंतर तिला शुटींग करणंही कठिण झालं होतं अशी वाईट अवस्था नेहाची झाली होती. बऱ्याचदा तिला सेटवरच रडू कोसळलं होतं. सध्या नेहाच्या या आत्महत्येच्या खुलाशाची चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.