Take a fresh look at your lifestyle.

सलमानचे फार्म हाऊस गुन्ह्यांचे राखणदार..?; कलाकारांच्या मृतदेहावर मातीचा ढिगार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाईजान सलमान खान नेहमीच काही ना काही विषयांमुळे चर्चेत असतो. यावेळी सलमान खानवर लावलेले आरोप असे काही आहेत कि ऐकून तुम्हाला तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही. यामुळे खरतर सलमान खानच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सलमानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसचे शेजारी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी सलमानवर केलेल्या आरोपांमध्ये लहान मुलांची तस्करी आणि कलाकारांचे मृतदेह पुरले जात असल्याच्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.

अभिनेता सलमान खान सध्या मुंबईतील वांद्रे स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. पण सलमान खानचं पनवेलमध्ये फार्म हाऊसही आहे. या फार्म हाऊसवर सलमान वारंवार जाताना दिसतो. एखादी पार्टी किंवा गेट टू गेदर साठी सलमान तिकडे जात असतो. सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊसचे नाव अर्पिता आहे.

याच्या शेजारी मालाडमधील कक्कड गृहस्थांचे फार्म हाऊस आहे. त्यांनीच सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सलमानच्या या फार्म हाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरले जातात. इतकेच नव्हे तर याच फार्म हाऊसवरून लहान मुलांची तस्करीदेखील केली जाते.

या सर्व प्रकरणात सलमान खानची बाजू समोर येणे अत्यंत गरजेचे असून त्याचे वकील प्रदीप गांधी यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. सलमानच्या प्रतिमेला इजा पोहोचवण्यासाठी असं केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पनवेलमध्ये सलमान खानचे ‘अर्पिता फार्म्स’ नामक फार्म हाऊस आहे. साधारण १५० एकरमध्ये पसरलेलं हे फार्म हाऊस त्याच्या बहिणीच्या नावावर आहे. सलमान नेहमीच एकटा किंवा त्याच्या मित्र मैत्रिणी वा कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल तर या फार्म हाऊसवर जात असतो. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी याच फार्म हाऊसवर त्याला साप चावल्याची घटना घडली होती.