Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मेंटल बाई.. ईस्लाम धर्माचा तमाशा बनवू नकोस’; रमजानमध्ये राखीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पुन्हा भडकले नेटकरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ड्रामाक्वीन राखी सावंत ही नेहमीच सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि वैवाहिक आयुष्यातील ड्रामेबाजीमुळे चर्चेत राहिली आहे. आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्माचा स्वीकार करून आपले नाव फातिमा ठेवले. इतकेच काय तर रमजान महिन्यात तिने रोजा ठेवलासुद्धा आणि मोडलासुद्धा. ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. यानंतर आता राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जो पाहून नेटकरी पुन्हा भडकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by FILMYGYAN VIDEOS (@filmygyanvideos)

सध्या इस्लाम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवतात. राखीनेही रोजा केला होता पण चुईंग खाल्ल्यामुळे तिचा रोजा तुटला. शिवाय नमाज पठण करताना तिने काही चुका केल्या होत्या ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं होत. यानंतर आता राखीने लुक चेंज करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी भडकले आहेत. या व्हिडिओमध्ये ती आधी बुरख्यामध्ये दिसते आणि त्यानंतर ‘मी माझ्या खऱ्या रूपात येऊ का..?’ असे विचारते. यानंतर ती थेट लाल रंगाच्या गोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.

राखीच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘इस्लाम धर्माची चेष्टा करू नकोस’. तर आणखी एकाने म्हटले, ‘आदिलने तुझी फसवणूक करणे वाईट होते. पण आता तुझे असले व्हिडीओ पाहिले कि वाटतं तू त्याच लायक आहेस’. आणखी एकाने लिहिलं कि, ‘प्लिज, इस्लामच्या पेहरावाचा तमाशा बनवू नकोस.. अन्यथा तुझ्यासोबत जे काही झालं तू त्याच लायकीची होतीस, असं आम्ही समजू’, तसेच आणखी एकाने म्हटले, ‘धर्म बदलास तर त्या धर्माचे नियमसुद्धा पाळ.. कोणत्याही धर्माचा अपमान करणे चूक आहे’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘कोणताही धर्म हा विनोद नसू शकतो. रमजान हा पवित्र महिना आहे आणि ती यामध्ये असले चाळे करून धर्माची चेष्टा करतेयस’. अशाप्रकारे नेटकऱ्यांनी राखीला समज देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postrakhi sawantSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group