Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला नेटकऱ्यांचा पाठिंबा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला आज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी आक्रमक झाले. परिणामी या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहता पाहता या आंदोलनाला हिंसक वळण आले. त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊला धारावी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर एकीकडे राजकारणातून हिंदुस्थानी भाऊच्या वर्तनावर आक्षेप घेतला जात असताना दुसरीकडे मात्र नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे नक्की कोणाच्या अडचणीत वाढ झाली आहे हे समजण्याच्या पलीकडे गेले आहे.

सध्या अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जी सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यात हिंदुस्थानी भाऊ हा स्वतः एक युट्युबर आहे. त्याची बोलण्याची आणि मुद्दे मांडण्याची शैली हि आक्रमक असली तरीही तरुणाईला वेधणारी आहे. शिवाय हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्येही हिंदुस्थानी भाऊ झळकला होता यामुळे त्याचा चाहता वर्ग तुफान आहे. शिवाय त्याचे फॉलोवर्स देखील मोठ्या संख्येत आहेत. यामुळे त्याचे प्रत्येक वक्तव्य तरुणाईला नशेप्रमाणे चढते. याहीवेळी असेच झाले.

मात्र सोशल मीडियावर सक्रिय राजकारणी नेत्यांकडून हिंदुस्थानी भाऊंच्या कृतीवर तीव्र निषेध करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक नेटकरीदेखील भाऊविरुद्ध बोलत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांपेक्षा समर्थकांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आय सपोर्ट हिंदुस्थानी भाऊ, जस्टीस फॉर हिंदुस्थानी भाऊ असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिले कि, सरकारकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्हाला काय वाटत हिंदुस्थानी भाऊ चा एवढा प्रभाव आहे का मुलांवर, मला नाही वाटत, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हेच सगळं होतय. बळीचा बकरा. तर अन्य एका विद्यार्थिनीने लिहिले, हिंदुस्थानी भाऊंना आमची समजूत काढल्याबद्दल अटक झाली! वर्षा_गायकवाड आमच्याशी एका धिक्कार रोबोटसारखे वागणे थांबवा, आमचे मानसिक आरोग्य तुमच्यामुळे खराब होत आहे.

तर अन्य एकाने लिहिले, भाऊला अटक का झाली हे जाणून घ्यायचे आहे? विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी? की राजकीय रॅलीसारखा देखावा निर्माण करण्यासाठी? जर पूर्वीचे खरे असेल तर थोडी लाज बाळगा, नंतरचे खरे असल्यास, काहीतरी शिका.