Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘देव्याची बायको झालीया सायको’; अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याने खराब केला नेटकऱ्यांचा मूड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Fadnavis
0
SHARES
5.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठी आणि हिंदी गाण्यानंतर नुकतेच पंजाबी गाणे गायले आहे. केवळ गायले नाही तर हे गाणे ६ जानेवारी २०२३ रोजी, शुक्रवारी टी सीरिजच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर रिलीजदेखील झाले आहे. ‘आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’ असे या गाण्याचे बोल असून अमृता यांच्या चाहत्यांनी या गाण्याला विशेष पसंती दिली आहे. पण हे गाणं ऐकून काही नेटकऱ्यांचा मूड इतका खराब झालाय कि त्यांचा ट्रोलिंगचा मूड झालाय. यामुळे सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस ट्रोल होत आहेत.

या गाण्यात होणाऱ्या नवरीची बॅचलरेट पार्टी सुरु आहे. ज्यामध्ये अमृता तिची मैत्रीण म्हणून सामील होतात आणि गाणे गाऊन मजा आणतात अशी गाण्याची थीम आहे. यामध्ये अविनाश मिश्रा आणि मेहक घाई या कलाकारांसोबत अमृता फडणवीस ठुमके लगावत आहेत. शिवाय गाण्यातील त्यांचा वेस्टर्न लूक प्रचंड चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

याआधीदेखील अमृता यांनी अनेक गाणी गायली आहेत. पण या गाण्यातील त्यांचा जोश पाहण्यासारखा आहे. असे असूनही सोशल मीडियावर हे गाणे रिलीज होताच नेटकऱ्यांनी ट्रोलिंगचा सूर धरला आहे. अनेक नेटकऱ्यांनी अमृता यांना ट्रोल केले आहे. एकाने देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत म्हटले आहे कि, ‘देव्याची बायको झालीया सायको’. आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘अध्यक्ष महोदय हे खूप चुकीचे आहे’.

तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मामी हे गाणं ऐकून ते रशियावाले यूक्रेन सोडून भारताच्या मागे लागतील’. तसेच आणखी एका युजरने लिहिले आहे कि, ‘काय ती म्हैस हंबरते.. काय ती म्हैस उड्या हाणते.. वाह! डोळे आणि कान इतके तृप्त झाले की रक्ताच्या स्वरुपात गुलाल उधळून घेतला’. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे कि, ‘हा अन्याय असच चालू राहिला तर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी लोक गाणे ऐकणेच बंद करतील माझं महिला आयोगाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी यावर काही तर करावं आणि जनतेला वाचवावे’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘पण एक गोष्ट खरी आहे…. पैसा,पॉवर मुळे तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकतात.. काहीही करू शकतात….पण talent विकत नाही घेऊ शकत’.

Tags: Amruta FadanvisInstagram PostSocial Media Trollingt seriesViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group