Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता नसिरुद्दीन शहांना भोवले शहाणपण; मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ संबोधल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे सध्या फारसे चित्रपटांमध्ये दिसत नाहीत. मात्र चित्रपटांमध्ये कमी दिसणारे नासिरुद्दीन त्यांच्या वक्तव्यामुळे मात्र रोज चर्चेत असतात. कारण आपला अनुभव त्यांच्या वक्तव्यातून सांगताना ते अनेकदा असं काही बोलून जातात कि सोशल मीडियावर त्याबाबत रोष व्यक्त केला जातो. असच काहीसं याहीवेळी झालं आहे. नुकतंच मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादात अडकले आहेत आणि सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. एका न्यूज पोर्टलला मुलाखत देताना नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हणून संबोधले आणि इथूनच वाद पेटला तो थेट ट्रोलिंगपर्यंत गेला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच वायरल होतॊय.

‘द वायर’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणाले कि, ‘मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, मुस्लिम याचा सामना करतील. कारण आम्हाला आमचं घर वाचवायचंय, आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे, आपलं कुटुंब वाचवायचं आहे आणि आपल्या मुलांना वाचवायचं आहे.’ यानंतर पुढे म्हणाले कि, ‘मुघलांनी केलेल्या अत्याचारांबाबत वारंवार बोलले जाते. मात्र, आपण हे का विसरतो? या मुघलांनीच देशासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. याच लोकांनी देशामध्ये कित्येक स्मारकं उभारली. यांच्या संस्कृतीमध्ये नाच, गाणी, चित्रकारी, साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. मुघल इथे या देशाला आपला देश बनवण्यासाठी आले होते. त्यांना खरं तर आपण शरणार्थी म्हणू शकतो.’

नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या याच वक्तव्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन नासिरुद्दीन शहांना शहाणपणाचे डोस दिले आहेत. एका युजरने ट्विटरवर एका फोटोच्या माध्यमातून ‘शरणार्थी’ आणि ‘शरण देणारा’ यातील फरक दाखवला आहे. तर दुसऱ्या एका युजरने ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड अत्याचार करून हत्या केली , हिंदूंची श्रद्धास्थान उध्वस्त केली आणि ते मुघल राष्ट्रनिर्माते .? नसरुद्दिन तर एक दिवस आतंकवादी लादेन ला अब्बू म्हणून घेईल यात शंका घ्यायच कारण नाही.’ ‘स्मारके, संस्कृती, नाच, गाणी आणि साहित्य हे मुघलांनी आणलं नाही. हे भारतात आधीपासूनच अस्तित्वात होतं. जर हे सगळं मुघलांचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये हे का दिसत नाही?’, असा प्रश्नदेखील अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.