Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमर रहे.. अमर रहे!! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेला प्रेक्षकांनी वाहिली श्रद्धांजली; नवा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 27, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rang Maza Vegla
0
SHARES
4.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि जबरदस्त टीआरपी ओढणारी मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. या मालिकेच्या शीर्षकाप्रमाणे त्याचे रंग पुरेपूर बदलणार आहेत. आतापर्यंत या मालिकेत आपण नात्यांचे बदलते रंग पाहिले आहेत. पण आता जे रंग या कथानकात उधळले जाणार आहेत त्याबाबत प्रेक्षकांनी काही बऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. नवा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी निर्माते, लेखक आणि कलाकार यांच्यावर ताशेरे ओढलेच. शिवाय मालिकेला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कार्तिक १४ वर्षांसाठी तुरुंगात गेल्यानंतर त्याचं कुटुंबदेखील हा वनवास भोगत होते. याआधी काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या या आनंदाला विरजण लागलं आणि ते एकमेकांपासून विचित्र वळणावर दुरावले. या १४ वर्षात दीपिका- कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. कार्तिकच्या सुटकेनंतर आता हा वनवास संपला असे वाटतानाच कार्तिकच्या मनात असणारी प्रतिशोधाची आग दीपाला वनवास भोगायला लावणार असे दिसत आहे. त्यामुळे असा ट्विस्ट पाहून नेटकरी भडकले आहेत आणि त्यांनी मालिकेला ट्रोल केलंय.

या प्रोमोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय कि, ‘दीपा आणि कार्तिक अमर रहे…मुली २१ वर्षांच्या झाल्या तरी दीपा एकदम फिट…अजब गजब आहे सगळं’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तुम्हा लोकांना निर्मळ आनंदी कुटुंब नाही का दाखवू शकत… सतत ते नवरा बायको भांडत असतात.. useless..’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘बंद करा हि फालतू सीरिअल.. खूप निगेटीव्ह आहे’. याशिवाय आणखी एकाने लिहिलंय कि,’अवघड आहे या मालिकेचे, साक्षीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? त्यामागे नक्की कोणाचा हात आहे ? हे सगळं गेलं शिमगा करायला.. आणि आता हे वेगळच, मालिकेच्या कथानकाला आणि रंग माझा वेगळाला भावपूर्ण श्रद्धांजली…RIP’. आणखी एकाने म्हटलंय, ‘बंद करा रे.. तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यातून रक्त काढल्याशिवाय काय गप्प बसणार नाय वाटत.’

Tags: Instagram PostOfficial PromoRang Maza Veglatv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group