Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीयता कधीच बदलू नका; भारत मुस्लिमांसाठी सर्वात सुरक्षित देश आहे, म्हणणाऱ्या KRKचे नवे ट्विट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे तेव्हापासून येथील नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तालिबान्यांनी दहशत धड जगूही देत नाही आणि मरूही देत नाहीये. त्यामुळे, अफगाणिस्तानातील भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दल शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, रविवारी भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं. हि बाब अतिशय मोठी आहे. भारतात दाखल झालेल्या या विमानात हिंदू, शीख आणि अगदी अफगाणी नागरिकदेखील समाविष्ट आहेत. या अश्या भीषण परिस्थितीवर अनेकांनी आपले मत आणि भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान आता KRKनेदेखील एक ट्विट करीत प्रतिक्रिया दिली आहे.

नेहमीच वादाग्रस्त विधान करणारा KRK म्हणजेच कमाल राशीद खान याने ट्विटरवरुन अफगाणिस्तानच्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तेथील मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त करताना तो म्हणाला कि, भारतातील मुस्लीम सर्वात सुरक्षीत असून भारत हा देश मुस्लीमांसाठी सर्वात चांगला आहे. अफगाणिस्तानमधील अनेक मुस्लीम आपल्या सुरक्षेसाठी सध्या भारतात येत आहेत. त्यामुळे, भारत हा मुस्लिमांसाठी सर्वात सुरक्षित देश आहे, हे माझं विधान १००% खरं ठरलं आहे, असेही त्याने म्हटले आहे. याचसोबत आपल्या ट्विटमध्ये त्याच्या मुलांना त्याने मोलाचा सल्ला दिला आहे कि, जगात कुठेही जा, काहीही करा, पण आपली राष्ट्रीयता कधीच बदलू नका. कारण, भारत जगात सर्वात चांगला देश आहे. भारतातील काही मुस्लीम भारत सुरक्षित नसल्याचं म्हणतात. कारण, त्यांनी इतर मुस्लीम देश पाहिले नाहीत.

गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर रविवारी वायुसेनेचं हे विमान उतरलं आणि याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांना उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेनेच घेतली. एकूण १६८ नागरिकांमध्ये लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतवासात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हे देखील हजर होते. एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, खासदार नरेंद्रसिंह खालसा यांना अश्रू अनावर झाले. शिवाय अफगाणिस्तानमध्ये गेल्या २० वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपत चाललंय. सगळं शुन्यावर येतंय, अशी माहिती देताना त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.