Take a fresh look at your lifestyle.

अगंबाई सुनबाई! सासूबाईंनी दिशाचे जोरदार स्वागत केले; पहा मिसेस वैद्यचा गृहप्रवेश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १४’ तून प्रचंड गाजलेला स्पर्धक राहुल वैद्य आणि मालिका अभिनेत्री दिशा परमार दोघेही नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. आधी अफेअर आणि आता लग्नामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यानंतर आता लग्नानंतरच्या विधी आणि नव्या सुनेचे कोडकौतुक यात वैद्य परिवार मग्न आहे. लग्नापूर्वीपासून होणारे मेहंदी, हळद, संगीत सेरमनी ते लग्नापर्यंत सगळ्या घडामोडी सोशल मीडियावर आपण पाहिल्या. आता लग्नानंतरच्या गृह प्रवेशाचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.

या ग्रँड वेडिंगची धम्माल मस्ती वेगवेगळ्या फोटोमुळे चाहत्यांनी अनुभवली. आता लग्नानंतरचे राहुल वैद्य आणि दिशा परमार- वैद्यचे नवनवीन व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेको खास क्षण रसिकांना पाहायला मिळत आहेत. लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सासरच्या मंडळींने दिशाचे ग्रँड वेलकम केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सासूबाईंनी तर दिशाला ओवाळून स्वागत केले. दिशाच्या एंट्रीवेळी घरात सगळे नातेवाईक हजर होते. या दरम्यान दिशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा नुसता पाऊस पडत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या सासरी नववधू दिशाने अशी बहारदार एंट्री केली आहे. यावेळी सासूबाईंनी लाडक्या सूनबाईचे अगदी थाटात स्वागत कले. हा व्हिडीओ लक्षवेधी ठरला असून ट्रेंडिंग व्हिडीओ आहे. या प्रवासाची सुरुवात राहुलने दिशाच्या वाढदिवसानिमित्ताने टेलीव्हिजनवरून सर्वांसमोर तिला प्रपोज करीत केली होती. नोव्हेंबर ८ ला दिशाचा वाढदिवस होता आणि त्यावेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर तिला लग्नासाठी मागणी घातली होती. अशाप्रकरे पहिल्यांदाच राहुलने थेट टीव्हीवर प्रेमाची कबूली दिली आणि मग दिशानेही त्याला सरप्राईज देत बिग बॉसच्या घरातच जाऊन होकार दिला होता.