Take a fresh look at your lifestyle.

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक; बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी खडाजंगी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अत्यंत लोकप्रिय झाला असून आता यातील प्रत्येक टास्क प्रत्येक सदस्य जिंकण्याच्या भावनेने खेळताना दिसत आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये आतापर्यंत १५ स्पर्धकांपैकी ३ सदस्य घराबाहेर पडले. यातील पहिले एव्हिक्शन स्वखुशीने झाले असून कीर्तनकार शिवलेला पाटील यांनी तब्येतीचे कारण पुढे करून गेममधून माघार घेतली. तर यानंतरचे दुसरे एव्हिक्शन अक्षय वाघमारे आणि तिसरे एव्हिक्शन सुरेख कुडची यांचे झाले. या दरम्यान घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्रीदेखील झाली. अभिनेता आदींसह वैद्यने फुल्ल राडा करत घरात एन्ट्री केली आणि स्पर्धकांची गोची केली. यानंतर आता नव्या टास्क दरम्यान बिग बॉसच्या घरात आजी आली आणि नव्या टास्कची रंगात चांगलीच वाढली आहे.

सध्या ‘बिग बॉसच्या घरात सगळ्यांची लाडकी आज्जी काय रे कार्ट्यानो म्हणत सगळ्यांची शाळा घेतेय आणि प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवताना दिसतेय. या आजीने काल गोष्टींमधील ऐकीव जादू खरीखुरी करून दाखवली आणि घरामध्ये ठेवला एक जादूचा दिवा. ज्या दिव्याद्वारे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली. याच्या माध्यमातून घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी स्पर्धक संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह हे चौघे नॉमिनेट झाले. यानंतर घरात सुरु झाले कॅप्टन्सी कार्य. त्यामुळॆ आता नव्या कॅप्टन पदासाठी चांगलीच खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

कॅप्टन व्हायचे असेल तर टास्क जिंकलंच पाहिजे आणि आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. जे जिंकेल तो नवा कॅप्टन बनण्याच्या शर्यतीचा उमेदवार ठरेल. नुकत्याच समोर आलेल्या नव्याकोऱ्या प्रोमोमध्ये सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. जो एक सदस्य सर्व फेर्‍यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे कि हा सदस्य कोण असेल? हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पहावा लागेल.