हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या वाढत्या प्राधुरभावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत काही सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची.सोनू सूद संकटमोचक म्हणून आता समोर येत आहे. सर्वप्रथम त्याने देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थांना ट्रेन व बसच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले. त्याच्या या मदतीची सर्वत्र स्तुती होत आहे. मात्र तो एवढ्यावरच थांबलेला नाही. आता त्याने आपलं लक्ष विदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थांकडे वळवलं आहे. अलिकडेच त्याने किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना भारतात आणलं होतं. आता तो जॉर्जियामधील विद्यार्थांना भारतात आणण्याची तयारी करत आहे.
New mission 😳
On it🤞 https://t.co/YYKOuztZqj
— sonu sood (@SonuSood) July 27, 2020
“जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थांना मदतीची गरज आहे.” अशा प्रकारचं ट्विट करुन सोनूकडे मदतीची विनंती करण्यात आली होती. या ट्विटची नोंद घेत विद्यार्थांच्या मदतीसाठी सोनूने तयारी सुरु केली आहे. याबाबात त्याने ट्विट करुन माहिती दिली. त्याच्या या ट्विटवर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वी सोनूने एक पोस्ट शेअर करत किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या ३ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी घेऊन येणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, त्याने या स्पाइस जेटच्या मदतीने यातील १५०० विद्यार्थ्यांना भारतात आणलं आहे. यातील काही फ्लाइट्स गुरुवारी रात्री उशीरा वाराणसी विमानतळावर पोहोचल्याचं त्याने सांगितलं.