Take a fresh look at your lifestyle.

सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट ; बॉलीवूड मधील ‘हे’ कलाकार साकारणार भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता तीन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीद्वारा या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

या आगामी चित्रपटाचं नाव ‘सुशांत: न्याय- द जस्टिस’ असं आहे. राहुल शर्मा आणि सरला सारागोई हे दोघं मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता जुबेर खान सुशांतची भूमिका साकारणार आहे. तर रियाच्या भूमिकेत श्रेया शुक्ला झळकणार आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार शक्ती कपूर या चित्रपटात एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. शिवाय अंकिता लोखंडे आणि सारा अली खान देखील या चित्रपटात झळकतील अशी शक्यता आहे. दरम्यान या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरु आहे. पुढल्या वर्षी चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल अशी माहिती निर्मात्यांनी दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’