Take a fresh look at your lifestyle.

I HATE YOU डॅडी; नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग घेऊन ‘तो’ येतोय पुन्हा..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डोक्यावर गांधी टोपी आणि पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा ज्यांचा पेहराव… झुपकेदार मिशा आणि अस्तित्वात आगीच्या ज्वाला आणि काटक शरीरयष्टी असं हे व्यक्तिमत्त्व. मुंबईच्या इतिहासात गँगवॉरचा इतिहास लिहिणारे अत्यंत महत्वपूर्ण नाव… असला जरी डाॅन तरी गरिबांना कैवारी वाटणारा… लोकांचा लोकनाथ म्हणून वावरणारा.. न्यायाच्या चौकटी तोडून जिथल्या तिथे न्याय करणारा… भायखळा सातरस्ता पासून अंडरवर्ल्डला थरकाप भरविणारे नाव…. म्हणजे डॅडी… अरुण गुलाब गवळी.

चाळीच्या लोकांवर अन्याय नाही त्यांना न्याय मिळवून देणारे दगडी चाळीचे दबंग उर्फ ‘डॅडी’. यांच्या जीवनावर आधारित ‘दगडी चाळ’ चित्रपटाने तुफान कमाई केली. यानंतर आता दगडी चाळ २ लवकरच येत आहे. याच्या टिझर नंतर आता एक पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये तो पुन्हा येतोय हे समजत. हा तो कोण..? जाणून घेऊया.

‘दगडी चाळ’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता मकरंद देशपांडे यांच्यासह अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पूजा सावंत दिसले होते. अलीकडेच ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टिझरमध्ये डॅडींच्या भूमिकेत पुन्हा एकदा मकरंद देशपांडे दिसणार आहेत हे समजलं. पण प्रश्न हा होता कि अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात दिसेलं का ..? त्याच उत्तर आहे हो. कारण याबाबत स्वतः अंकुश चौधरीने माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे अंकुशने नवं पोस्टर शेअर केलाय ज्यात तो स्वतः दिसतो आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. सोबत कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिलंय कि, ‘जे घडून गेलं ते पुसता नाही येणार…पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार… नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग… तो येतोय पुन्हा…’ हा तो म्हणजे कोण..? तर हा तो म्हणजे सूर्या. सूर्या हेच पात्र अंकुशने ‘दगडी चाळ’ चित्रपटात साकारलं होत. आता पुन्हाएकदा याच पात्रातून एका नव्या गोष्टीसह तो ‘दगडी चाळ २’ मध्ये फुल्ल ऍक्शन करायला तयार आहे.