Take a fresh look at your lifestyle.

‘दे धक्का 2’चा नवा प्रोमो रिलीज; व्हिडीओ पहालं तर हसून हसून दमालं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेली कलाकृती ‘दे धक्का’ नंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘दे धक्का २’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. एक दोन नाही तर तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा जाधव कुटुंब धुमशान घालणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच सगळे चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. यानंतर चित्रपटाचा टिझर आला मग ट्रेलर आणि आता आणखी एक ट्रेलर. हा प्रत्येक व्हिडीओ पाहून तुम्ही हसला नाहीत तर नवलच. प्रेक्षकांना हसवायची पूर्ण तयारी करून दे धक्का २ ची टीम मैदानात उतरली आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अभिनेते शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, प्रवीण तरडे हे कलाकार या चित्रपटातून आपल्याला हसवायला येणार आहेत.

यंदा हा चित्रपट आपल्याला परदेशवारी घडवणार आहे. यंदा जाधव कुटुंबीय थेट लंडनमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबाची असामान्य कथा म्हणजे दे धक्का २ असं म्हणता येईल. या नव्या ट्रेलरमध्ये मकरंद आणि तात्या यांच्यातलं लुटुपुटु चुटुक मजेशीर गोष्टी दिसून येत आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता मकरंद अनासपूरे म्हणाले कि, ‘दे धक्का चित्रपटाला आजही प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाची कहानी मांडण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून याला सर्वाधिक जास्त प्रतिसाद मिळत आहे.’ तर अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला कि, ‘इतक्या वर्षानंतर दुसऱ्या भागात पुन्हा तेच पात्र साकारताना अडचणी आल्या. मात्र, मांजरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे निम्म्या गोष्टी सोप्या झाल्या.’