Take a fresh look at your lifestyle.

तारिक पे तारिक; प्रभासच्या ‘राधे श्याम’साठी नवी प्रदर्शनाची तारीख जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक अगदी आ वासून प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या राधे श्याम या बहुचर्चित चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र आता ह्या उत्सुकतेला उत्तर मिळाले आहे. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो डेपर लूकमध्ये दिसतोय. शिवाय यूरोपमधील रस्त्यावर तो दिसत आहे. हि पोस्ट करताना पोस्टरमध्ये लिहिलेले दिसते कि, हा चित्रपट येत्या मकर संक्रांतिला अर्थात पोंगलला म्हणजेच १४ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हा फोटो शेअर करताना प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही सर्व माझी रोमँटिक गाथा पाहाल यासाठी आता मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, #राधेश्याम, ज्याची एक नवीन रिलीज तारीख आहे -१४ जानेवारी, २०२२ जगभरात!” सध्या प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत. त्यामुळे हि बातमी निश्चितच प्रेक्षकांना आनंदित करणारी आहे. याबाबत अनेकांचे म्हणणे आहे की, हा चित्रपट वर्षभरातील सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असणार आहे. या घोषणेनंतर प्रभासच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल तर उत्कंठतेने उच्चांक गाठला असेल.

या चित्रपटाच्या निमित्ताने एका मोठ्या काळानंतर प्रभास रोमँटिक शैलीत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे दिसणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामधून प्रभास लवरबॉय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मुख्य आणि विशेष बाब म्हणजे कि, ‘राधे श्याम’ हा एक बहुभाषीक चित्रपट आहे. गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत राधे श्यामचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.