Take a fresh look at your lifestyle.

भयावह हास्यामागे दडलाय ‘एक व्हिलन- Returns’; नवी रिलीज डेट जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षक म्हणून एखादे नवे आणि आकर्षक कथानक आपण कधीच विसरत नाही. असेच काहीसे कथानक आहे ‘एक विलन’ या चित्रपटाचे. त्यामुळे हि लव स्टोरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. लवकरच एक व्हिलन रिटर्न हा चित्रपट येणार या घोषणेनंतर त्याच्या रिलीज डेटची मोठी चर्चा होती. याआधी ‘एक विलन रिटर्न’ची रिलीज डेट ८ जुलै २०२२ असेल असे निश्चित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट बदलून नवी डेट फहिन्यात आली आहे याची माहिती अभिनेता जॉन इब्राहिमने दिली आहे.

अभिनेता जॉन इब्राहिम ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची माहिती त्याने अलीकडेच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक लाल कलरच्या बॅकग्राउंडला एक भयानक स्माईली असलेला फोटो पोस्ट केला आहे. याचे पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि तितकेच भयावह आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१४ मधे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याचे निर्देशन मोहित सुरी याने केले होते. शिवाय या चित्रपटात रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत होते. त्यांच्या त्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती आणि या चित्रपटाने चांगली कामे केली होती.

यानंतर एक व्हिलन रिटर्न या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. यावेळी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जॉन इब्राहिम मुख्य भूमिकेत दिसेल. तर अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा हे अन्य मुख्य भूमिकेत दिसतील. याआधी एक विलन रिटर्नची रिलीज डेट ८ जुलै होती. मात्र आता या चित्रपटाची सुधारित नवी रिलीज डेट समोर आली आहे. येत्या २९ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे. एक व्हिलन ने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली आहे यानंतर आता हा एक व्हिलन रिटर्न प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.