Take a fresh look at your lifestyle.

पक्कं ठरलं! ‘कॉफी विथ करण’चा नवा सीजन येणार; पहिल्याच भागात ‘हे’ कलाकार झळकणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामांकित निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. पण अलीकडेच करणने केलेल्या एका घोषणेनंतर सर्वत्र या शोबाबत काही भलत्याच चर्चा रंगल्या होत्या. बुधवारी करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ हा शो आता पुन्हा येणार नाही असे सांगितले आणि चाहते नाराज झाले. पण प्रेक्षकांची इच्छा डावलून कशी चालेल. म्हणूनच या शोचा आगामी नवाकोरा सीजन येण्यास सज्ज झाला आहे. फक्त हा शो चॅनेल वर नाही तर ओटीटीवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे शोबाबत उठणाऱ्या बाकी सर्व बाबींकडे दुर्लक्ष करा आणि आनंद साजरा करा. इतकेच नव्हे तर शोच्या पहिल्या भागात कोणते कलाकार येणार हेदेखील ठरले आहे.

‘कॉफी विथ करण’च्या माध्यमातून विविध सेलिब्रिटींचे अनेक किस्से, अनुभव आणि गुपितं उघड होतात. या कार्यक्रमाचे आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल ६ सीजन जोरदार रंगले आहेत. पण आता पुढचा सीजन कधी येणार..? याची उत्सुकता चाहत्यांना लागली असताना करणने एक निवेदन शेअर करत त्यात ‘कॉफी विथ करण’ हा शो बंद होणार असल्याचं सांगितलं.

यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. पुढे काहीच वेळात त्याने हि अफवा असून आपला शो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे असे सांगितले. इतकेच नव्हे तर आता शोच्या पहिल्याच भागात बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट येणार असे जाहीर करण्यात आले आहे.

याआधी २०२१ सालामध्ये करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ चे काही स्पेशल एपिसोड होस्ट केले होते, जे OTT प्लॅटफॉर्मवरच दाखवण्यात आले होते. या शोमध्ये केवळ नेपोकिड्स येतात अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली होती. पण आता यंदाच्या पर्वात कोण येणार..? कोणासोबत चर्चा रंगणार..? कोणाची गुपितं उघड होणार हे अतिशय औत्सुक्याचे ठरेल. यामध्ये तूर्तास दोन नावांवर शिक्कमोर्तब झाली आहे. ते म्हणजे आलीया भट आणि अभिनेता रणवीर सिंग. याबाबत एका माध्यमाने माहिती दिली असून पुढच्या आठवड्यात चित्रीकरण सुरु होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती हा शो सुरु होण्याची.