हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। करोडपती होण्याचं स्वप्न फक्त पाहायचं नाही तर पूर्ण करायचं असेल तर या स्वप्नांना आणि प्रयत्नांना वेग द्या. कारण कोणत्याही लॉटरीशिवाय तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त ज्ञानाची असेल साथ तर करोड रुपये येथील घरात. जर तुम्हीही हेच स्वप्न उराशी बाळगत असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. कारण सोनी मराठी घेऊन येत आहे ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व तेही येत्या २३ फेब्रुवारी २०२२ पासून. त्यामुळे करोडपती होण्यासाठी आता वाट पाहू नका तयारीला लागा.
View this post on Instagram
सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पाहिलों जातो. ज्ञानाच्या जोरावर आतापर्यंत अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे आणि अनेकांनी आपले स्वप्न साकार केले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अगदी सर्व सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सारे पाहतात आणि फॉलो सुद्धा करतात. यानंतर आता या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या २३ फेब्रुवारी २०२२ पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. यावेळी १४ दिवस आणि १४ प्रश्न, असं या कार्यक्रमाच्या पर्वाचं स्वरूप आहे.
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. मागील पर्वाचेदेखील सचिन खेडेकर यांनी होस्टिंग केले होते. सचिन खेडेकर हे मराठी प्रेक्षकांसाठी परिचयाचे आहेत. दमदार आवाज आणि बोलण्याचे कौशल्य अधिक लक्षवेधी असल्यामुळे सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन अनेकांना आवडतं. त्यामुळे यंदाच्या या पर्वाचं सूत्रसंचालनही सचिन खेडेकर यांचीच जबाबीदारी आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या यंदाच्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा हा प्रोमो आहे. दरम्यान २३ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होत आहेत. यासाठी ७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून तुम्हाला या खेळात सहभागी होता येईल.