Take a fresh look at your lifestyle.

तो अपघात..दिपूच्या जीवावर बेतणार..?;‘मन उडु उडु झालं’ मालिकेत गंभीर ट्विस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काही मालिका अशा असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करीत असतात. त्या मालिकेतील प्रत्येक पत्रावर प्रेक्षक आपल कुणीतरी असावं अस प्रेम करत असतात. अशीच एक मालिका म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारी मन उडू उडू झालं. या मालिकेतील इंद्रा आणि दिपूने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तर मालिकेचे कथानक लोकांना फार आवडतं आहे. सध्या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. ज्यामध्ये सानिका गरोदर नसल्याचं सगळ्यांना कळणार आहे तर दुसरीकडे दिपुचा अपघात होणार आहे. या गंभीर ट्विस्टने प्रेक्षकांना मोठा धक्का लागणार आहे.

कथेत जर खलनायक असेल तर कथा रंजक कशी होणार..? म्हणूनच या मालिकेत सानिका आणि कार्तिक हे खलनायक दाखविले आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकेमूळे मालिकेत आणखी मजा येते. सध्या सानिका आपल्या फायद्यासाठी गरोदर असल्याचं नाटक करतेय. पण आता तिचं हे खोटं सगळ्यांसमोर येणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की, देशपांडे सरांच्या घरी असलेल्या पूजेला सानिका आणि कार्तिक येतात. तेव्हा सानिका पपई खाते आणि त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जायची गडबड सुरु होते. पण सानिका डॉक्टरकडे जायला नकार देते. पण दिपू तिला डॉक्टरकडे घेऊन जातेच आणि दिपूला कळतं की सानिका गरोदर नाही. पण ती ही गोष्ट घरी सांगत नाही. दरम्यान सानिकाची चोर ओटी भरताना तिला माहेरून मोठं गिफ्ट मिळालं नाही म्हणून ती भांडू लागते. तिचा तमाशा खूप वेळ चालूच असतो आणि ते पाहून अखेर दिपू सगळ्यांना खरं सांगते. आता सानिकाचा खोटारडेपणा समोर आल्यावर घरचे काय करणार ते पाहणे रंजक ठरणार आहे.

तर दुसरीकडे सानिकामुळे दिपूचा अपघात होणार आहे असे मालिकेच्या आगामी प्रोमोत दाखवले आहे. दरम्यान सानिकाला दिपू समजवायला जाते पण ती मात्र दिपूलाच हात धरून घराबाहेर काढते. यात दिपूला ती जोरात धक्का देते आणि या धक्क्यामुळे दिपू रस्त्यावर पडते. दरम्यान रस्त्यावरील एका गाडीची तिला जोरदार धडक लागते आणि ती जमिनीवर कोसळते. या नव्या प्रोमोमुळे चाहते दीपूच्या चिंतेत असल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे तर अनेक प्रेक्षकांनी सानिकावर रागसुद्धा व्यक्त केला आहे.