बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केली

Sharing is caring!

हॅलो बॉलिवूड । अर्ध्या शतकापूर्वी रिलीज झालेल्या ‘सात हिंदुस्थानी’ पासून सुरू झालेल्या हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत बॉलीवूड शेहेनशाह अमिताभ बच्चन यांना आज चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण झाले आहेत.  अमिताभ बच्चन यांचा ‘सात हिंदुस्तानी’  आजरोजी सात नोव्हेंबरला  प्रदर्शित झाला होता आणि  आज तो बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण करतो आहे.  बिग बी यांना  बॉलीवूड मधील ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बॉलिवूड जगतामधून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

 

वडिलांचा ५० वर्षांचा  प्रवासाबाबत अभिषेक बच्चन यांनी आज ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . आपल्या पोस्ट अभिषेक बच्चन म्हणतात ”फक्त एक मुलगा म्हणून नाही, तर अभिनेता आणि चाहता म्हणून अमिताभ बच्चन यांच्या सारखा  महान अभिनेता  पाहिल्याचा आपल्या सर्वांना अभिमान  आहे. प्रशंसा करण्यासारखे बरेच काही आहे, शिकण्यासारखे आहे आणि अनेक गोष्टींबद्दल अधिक कौतुक देखील आहे. सिनेमाप्रेमींच्या अनेक पिढ्यांनी  असे म्हटले आहे की आम्ही बच्चन यांच्या  काळात राहत होतो. फिल्म इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन पप्पा  आम्ही आता पुढच्या 50 ची वाट पाहत आहोत !…”.

Leave a Reply