… अन शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना!

Sharing is caring!

मुंबई :- बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर पाकिस्तानच्या लष्कराने त्याच्यावर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे शाहरुख चर्चेत आला आहे. काश्मीर प्रश्नावरून शाहरुखवर टीका करत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शाहरूखला एक आवाहनही केले आहे. शाहरुखने वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला यावरच पाकिस्तानी सेने भडकली आहे.

शाहरुख खानची एक वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला. याच वेबसीरिजवरून पाकिस्तानची सेना शाहरुखवर भडकली आहे. ‘शाहरुख तुला बॉलिवूड सिंड्रोम आहे. सत्य जाणून घेण्यसाठी तू रॉचे एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि २७ फेब्रुवारी २०१९ कडे पाहायला हवे. शाहरुख काश्मीरमधील जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तू आवाज उठवायला हवा. आरएसएसच्या नाझीवादी हिंदुत्वामुळे या अत्याचारांमध्ये सतत वाढ होत आहे,’ असे ट्वीट आसिफ गफूर यांनी केले आहे.

‘बार्ड ऑफ ब्लड’ ही शाहरुख खानची वेबसीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमधून भारताच्या धाडसी गुप्तहेरांबद्दल माहिती देण्यात आली आहे. जे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भारतीय मिशन पूर्ण करतात. या वेबसीरिजमधून पाकिस्तानी सैन्याबद्दल काही धक्कादायक खुलासे करण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये म्हटले आहे. त्यामुळे शाहरुखविरोधात पाकिस्तानच्या लष्कराने आक्रमक प्रतिक्रिया दिल्याची चर्चा आहे.

Leave a Reply