Take a fresh look at your lifestyle.

निथा शेट्टी EVICTION; बिग बॉस मराठीच्या घरातून दुसऱ्या वाईल्ड कार्डची एक्झिट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वत आतापर्यंत दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या. या दोन्ही एंट्री एकदम जबरदस्त होत्या. आधी अभिनेता आदिश वैद्यने घरात धडाकेबाज एंट्री केली. यानंतर तो अगदी दोन आठवड्यातच घराबाहेर झाला. यानंतर नुकतीच दोन आठवड्याभरापूर्वी अभिनेत्री निथा शेट्टीने घरात वाईल्ड कार्ड एंट्री केली आणि काल तिचाही बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. अगदी ती आली काय आणि गेली काय काहीही कळले नाही. अगदी दोन आठवड्यातच ती घराबाहेर पडली. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे आलेली निथा ही मराठी आणि हिंदीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकांसह वेब सीरिपर्यंत अशा अनेक माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

गेल्या आठवड्यात जय, विशाल, दादूस, निथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास असे सदस्य नॉमिनेट झाले होते. शनिवारी यापैकी जय, विशाल आणि दादूस हे तिघे सेफ असल्याचे मांजरेकरांनी सांगितले. त्यामुळे अर्थातच निथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघांमधून कोणी एक घराबाहेर जाणार, हे स्पष्ट झाले होते. सरतेशेवटी निथा आणि सोनाली या दोन्ही सदस्या डेंजर झोनमध्ये आल्या होत्या आणि यानंतर अखेर मांजरेकरांनी निथा शेट्टीचा बिग बॉस मराठी ३च्या घरातील प्रवास संपल्याचे सांगितले आणि निथाला घरामधून बाहेर जावं लागलं.

अभिनेत्री निथा शेट्टीने तेनाली रमण, घरी की लक्ष्मी बेटियाँ, परावतार श्री कृष्ण अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. निथाने आतापर्यंत २९ मालिका आणि चारपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच तिने ओटीटीवरही पदार्पण केलं असून ती अल्ट बालाजीवरील एकता कपूर दिग्दर्शित गंदी बात ४ या वेब सीरिजमध्ये बोल्ड भूमिकेत झळकली आहे.

अनेक मालिकांमध्ये सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या निथाने गंदी बात ४ मध्ये प्रचंड बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये काम करण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती.