Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भाग्य दिले तू मला; कलर्स मराठीच्या आगामी मालिकेत निवेदिता सराफ दिसणार नव्या भूमिकेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
bhagya dile tu mala
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी हि सध्या लोकप्रिय वाहिनींपैकी एक वाहिनी आहे. या वाहिनीवर आता एक नवी मालिका येत आहे. या मालिकेचे नाव आहे भाग्य दिले तू मला. हि मालिका येत्या ४ एप्रिल २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. यात अभिनेत्री निवेदिता सराफ पहायला मिळत आहेत. म्हणजेच आसावरी या भूमिकेनंतर आता एका नव्या भूमिकेतून निवेदिता सराफ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

“त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास,” असं म्हणत परस्परविरोधी भूमिकांची ओळख या प्रोमोतून करून दिली आहे. या मालिकेत निवेदिता सराफ या रत्नमाला नामक व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. या मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या कि, “तीन पात्रांभोवती फिरणार्‍या या कथानकात ‘रत्नमाला’ या पात्राचं ठाम असं स्वत:चं मत, स्वत:चे विचार आहेत. खूपच वेगळी भूमिका आहे आणि म्हणूनच मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पुढे, रत्नमालाने स्व:बळावर स्वत:च विश्व निर्माण केल आहे. तिने इथवरची वाटचाल आपल्या परंपरा, संस्कृतीला घट्ट धरूनच केली आहे. परंतु याउलट राजवर्धन आहे आणि इथेच दोन पिढींमधील विचारांमध्ये खटके उडत आहेत. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच पण दोघेही आपल्यापल्या मतांवर ठाम आहेत. या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो आणि म्हणूनच रत्नमालाला अशी मुलगी घरात सून म्हणून हवी आहे जी तिचंच प्रतिबिंब आहे. जिच्या मदतीने ती आपल्या मुलाला सुधारू शकेल. कारण, आज आपण प्रत्येक घरामध्ये हे होताना बघतो. माझं यावर एकंच म्हणणं आहे जुन्या लोकांचा अनुभव घ्या आणि पुढे जा. पण आताच्या मुलांना हे पटत नाही. ही दोन पिढींमधील जी वैचारिक तफावत आहे ती या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.”

Tags: Bhagya Dile Tu malacolors marathiNivedita SarafOfficial TeaserUpcoming Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group