Take a fresh look at your lifestyle.

‘नो बिंदी, नो बिझनेस’: मलाबार गोल्डची जाहिरात अडचणीत; नेटकऱ्यांकडून बेबोवर टीकांची झोड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हि इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होऊ लागली आहे. अलीकडेच तिने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’साठी एक जाहिरात शूट केली आहे. हि जाहिरात अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर करण्यात अली आहे. यात करीनच लूक एकदम जबरदस्त असला तरीही तिच्या चाहत्यांना तो भावला नाही. तिची हि जाहिरात सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रोषाला बळी पडताना दिसत आहे. या जाहिरातीत करिनाने बिंदी न लावल्यामुळे नेटकाऱ्यानी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ अशी भूमिका घेतली आहे. करीनाच्या या कृत्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ हा अतिशय प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे. याच्या सर्व जाहिराती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात मात्र यावेळी असे झाले नाही. तर याउलट हि नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून यामध्ये करीनाने तिच्या कपाळावर टिकली लावलेली नाही. म्हणून नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सोबत #BoycottMalabarGold आणि #NoBindiNoBusiness अशा हॅशटॅगला उधाण आलं आहे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत.

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत मोठा आणि पवित्र सण मानला जातो. या दिवशी अनेकजण दागिन्यांची खरेदी करतात. तर हिंदूंच्या सणाच्या जाहिरातीत एकतर करीनाने काम केलं आणि त्यात कपाळावर टिकली लावली नाही हे नेटकऱ्यांना खटकलं. त्यामुळे सोशल मीडियावर जाहिरातीत करिनाने टिकली का लावली नाही..? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. तर अन्य एकाने कमेंट करीत लिहिले कि, ‘मलाबार गोल्डच्या नव्या जाहिरातीने सणाचा माहौल कसा खराब करायचा याचं उदाहरण सादर केलंय.

याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, भारतीय महिलांच्या पेहरावात टिकली अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हिंदू परंपरांची खिल्ली उडवल्यानंतर आम्ही तुमचे दागिने खरेदी करू असं वाटतंय का..? तर ‘मलाबार गोल्ड खरंच हिंदू संस्कृतीचा सन्मान करते का’, असा आणखी एकाने केला. ‘मलाबार गोल्डला जर टिकलीचं महत्त्व समजत नसेल तर अशा ब्रँडला बाहेरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.