Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस मराठी 4 – कोण राहणार? कोण जाणार?; नॉमिनेशन टास्कचा ‘या’ स्पर्धकांना फटका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss Marathi 4
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु झाले आहे. या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या दोनच दिवसात स्पर्धकांची शिट्टी गुल्ल झाली आहे. त्यामुळॆ सगळ्या स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे असे दिसत आहे. प्रिमिअरवेळी सहभागी स्पर्धकांनी आपल्याविषयी खूप काही सांगितलं पण आत गेल्यावर त्यांचा कायापालट होणे निश्चित आहे. नुकतेच या शोमधील पहिल्या आठवड्याचे पहिले नॉमिनेशन कार्य पार पडले आणि याचा काही सदस्यांना जबर फटका बसला.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉसने तयार केलेल्या चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद यांना निरुपयोगी सदस्य ठरवले. यानंतर “रूम ऑफ फॉर्च्युन” खोलण्यात आले आणि या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले. यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. या सांगकाम्या ठरलेल्या चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण,सोबत त्यांना एक पावरदेखील मिळाली आहे. आता हे सदस्य हे त्यांच्या या पावरचा वापर करू लागले आहे. नुकतेच या सिझनचे पहिले नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली” झाले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या नॉमिनेशनदरम्यान अमृता देशमुखवर जो तो येऊन बाटली फोडताना दिसला आणि यावर तीने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली कि, “बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात.” तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणत त्याला नॉमिनेशनमध्ये टाकलं. असे निखिल, अमृता देशमुख, विकास, योगेश, तेजस्विनी आणि यशश्री हे सदस्य नॉमिनेट झाले. यानंतर आता उत्सुकता आहे ती पहिल्याच आठवड्यात कोणते सदस्य घराबाहेर होणार आहेत हे पाहण्याची. यासाठी बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठी आणि कधीही voot ऍपवर जरूर पहा.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group