Take a fresh look at your lifestyle.

एव्हढं का कोणी Hot दिसायचं..?; नोरा फतेहीचा क्लासी लूक सोशल मीडियावर चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या फिगरबद्दल काय बोलणार..? इतकी आकर्षक आणि स्लीम ड्रीम फिगर असलेली आणि त्यातही उत्तम नृत्यांगना म्हणून तिला लोक ओळखतात. तिचा क्लासी आणि हॉटी लूक अनेकदा तरुणांना घायाळ करत असतो. दरम्यान तिच्या झकास फिगरसह तिच्या डान्सचेसुद्धा लाखो दिवाने आहेत.

अगदी स्वतः डान्स कोरिओग्राफर टेरेन्स लुईन्स सुद्धा तिच्या अदांवर फिदा आहे हे काही वेगळं सांगायलाच नको. सध्या सोशल मीडियावर नोराचा असा एक लूक व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांनी तोंडात बोट घातली असतील. तिला क्लासी जबरदस्त लूक एकदम जालीम आहे बरं का. विश्वास बसत नाही तर खालील फोटो पहा.

काय आहेत ना एकदम उफफ्फ…. सध्या नोराचा हा क्लासी आणि ट्रेंडी लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. तसे पाहाल तर कलाकारांना सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी काही वेगळं करण्याची फारशी गरज नसतेच मुळी. त्यांचा एक लूक आणि एक अदापण चाहत्यांसाठी पुरेशी असते. आता नोराचे हे फोटो पहा ना.

तिने परिधान केलेल्या आऊटफिटमध्ये ती एकदम जलपरीचा फील देतेय. चंदेरी रंगाचा फ्लोरल लॉन्ग आऊटफिट आणि त्यासह कमरपट्टा तसेच साजिशी पॉईंट हिल नोराच्या लुकला लक्षवेधी बनवत आहे. तिची फिगर इतकी प्रॉपर दिसतेय कि बस्स. देखनेवाला बस देखता रेह जाये। तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध कमेंट्स करीत तिचे आणि तिच्या आऊटफिटचे कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, वॉव.. किती छान दिसते आहेस. तर आणखी एकाने खूप छान लूक आहे असे म्हणत तिच्या आऊटफिटचे कौतुक केले आहे. नोरा फाटेही अशी अभिनेत्री आहे जिने तिच्या मूव्जची एक झलक जरी दाखवली तरी तिचा व्हिडिओ लगेच सोशल मिडियावर व्हायरल होतो. ‘बॅले’ डान्समध्ये तर तिचे विशेष प्राविण्य आहे आणि याच नृत्यामुळे तिला कायम प्रेक्षकांकडून वाहवाह मिळते आहे.