Take a fresh look at your lifestyle.

शिवाजी नाही..छत्रपती शिवाजी महाराज; चिन्मय मांडलेकरने सुधारली अँकरची चूक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण आहे बिट्टा.’ अलीकडेच ‘पावनखिंड’ चित्रपटात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या भूमिकेत दिसलेला हा अभिनेता नंतर ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये बिट्टा या दहशतवाद्याची भूमिका साकारताना दिसला. यामुळे बोलणाऱ्यांचे दोन गट झाले. दरम्यान त्याला या दोन्ही भूमिकांबाबत एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अँकरकडून महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला असता चिन्मयने त्यास तडक थांबवून चूक सुधारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

चिन्मयने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा कराटे’ या क्रूर दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे प्रेक्षकांचा रोष तो अगदी हसतमुखाने झेलत आहे. त्यामुळे सर्वत्र त्याच्यावर कौतुकही तितकेच होत आहे.

पावनखिंड मधील शिवराय आणि आता दहशतवादी या दोन्ही भूमिका टोकाच्या असल्यामुळे माध्यमांकडून त्याची विशेष मुलाखत घेण्यात येत आहे. दरम्यान एका वाहिनीच्या अँकरने चिन्मयचा परिचय देताना शिवरायांचा उल्लेख शिवाजी असा केला. तर चिन्मयने त्याला लगेच थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, असे फार प्रेमळ शब्दात सांगितले. त्याचे महाराजांबद्दल असलेले निस्सीम प्रेम पाहून चाहते भारावून गेले आहेत.

सोशल मीडियावर चिन्मयचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. शिवाय या मुलाखतीचा व्हिडीओ स्वतः चिन्मयनेदेखील त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात, कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय! या पोस्टवर अनेक लोकांनी विविध कमेंट्स करीत चिन्मयच्या कृतीचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. म्हणूनच आम्हाला तुझा खूप अभिमान आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत चाहत्यांनी चिन्मयचे कौतुक केले आहे.