Take a fresh look at your lifestyle.

थुंकना नहीं, दुआओं को फुँकना कहते हैं।; SRK’च्या व्हायरल व्हिडिओवर कुठे ट्रोलिंग तर कुठे पाठराखण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी लता दीदींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. लता दीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्य संस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्या चाहत्यांचा महासागर लोटला होता. यावेळी उपस्थित कलाकार मंडळींमध्ये शाहरुख खान सेक्रेटरी पूजा दादलानीसोबत उपस्थित होता. यावेळी शाहरुख लता दीदींचे अंतिम दर्शन घेताना आणि त्यांना श्रद्धांजली वाहताना थुंकला असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. अनेक नेटकरी यावरून शाहरुखला ट्रोल करत आहेत. मात्र त्याचवेळी अनेक युजर्स शाहरुखची बाजू घेताना दिसत आहेत.

शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. यानंतर मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभ्या असताना शाहरुखने प्रथम दीदींचे दर्शन घेतले. यानंतर त्याने दीदींसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मास्क खाली घेऊन वाकून पार्थिव शरीरावर फुंकर मारली. पुढे हात जोडून पार्थिवाची प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला.

शाहरुखच्या अशा पद्धतीने दीदींना श्रद्धांजली देण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तर काहींनी दीदींच्या पार्थिवावर शाहरुख थुंकला असे वावटळ उठवले. यानंतर सोशल मीडियावर शाहरुख खानला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. अशावेळी अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी शाहरुखची बाजू घेतली आहे.

शाहरुखचे चाहते म्हणाले कि, हजारोंच्या गर्दीत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या पार्थिवावर थुंकणे कसे शक्य आहे? काय वाट्टेल ते बोलून ट्रोल करू नका. तर अनेकांनी लिहिले कि, शाहरुखने दुआचे पठण केल्यानंतर फुंकर मारली होती. यावरून तर्क लावण्याची गरज नाही. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धर्मावरून ट्रोल करू नका. ट्रोलर्सने नालायकपणा बंद करावा असे म्हटले आहे.

तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, याला थुंकणे म्हणतात का? ‘याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता.