Take a fresh look at your lifestyle.

‘कारट्यांनो, किती धुडगूस घालता रे?’; बिग बॉस मराठीचे स्पर्धक आज्जीच्या नजरकैदेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा खेळ आता चांगलाच रंगात आलेला आहे. दरम्यान आता घरातून नॉमिनेशनसह एलिमिनेशन देखील होऊ लागले आहे. गेल्या आठवड्यात अक्षय वाघमारेच्या एलिमिनेशननंतर या रविवारी म्हणजेच काल घरामधून सुरेखा कुडची यांना घराबाहेर जावे लागले. यानंतर आता एक नवा आठवडा नव्या आव्हानांसह सुरु झाला आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे एका नवा टास्क आणि या टास्कमध्ये सदस्यांना मिळणार आहे खास सरप्राईझ. काल रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये मोठ्या आणि जबाबदार व्यक्तीचे स्वागत केले आहे. या व्यक्तीला पाहून सदस्यांचा देखील आनंद द्विगुणित झाला आहे. हा सदस्य म्हणजे आज्जी.

होय.. बिग बॉस मराठीच्या घरात आज्जी आली आहे. सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये असे धावत गेले कि बस्स. याचे कारणही विशेष होते ना.. कारण म्हणजे… तितकी खास, जवळची आणि सगळ्यांना हवीहवीशी आजी या घरामध्ये आलेली त्यांना दिसली. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये आवाज घुमला तो आज्जीचा. हो.. हो.. आज्जीचा.. तो हि कसा? “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे…? हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला”. हे इतकेच पुरेसे होते सर्वांसाठी.

प्रत्येक नाते वेगळे आणि हवेहवेसे असते. यातील एक नाते आज्जीसोबत असते. आज्जी म्हणजे ती व्यक्ती जी निस्वार्थपणे आपल्याला माया लावते, जीव लावते, प्रेम करते आणि पुन्हा परतीची अपेक्षादेखील करत नाही. आई वडील ओरडल्यावर किंवा मारू लागल्यावर जी मध्ये पडून त्यांनाच ओरडते पण आपल्याला जवळ घेऊन आपली चूक समजावते ती आज्जी. कधी लहान होऊन आपल्याशी खेळते, मैत्री करते आणि लाड पुरवते. बटव्यातील १ रुपया हातावर ठेवून चॉकलेट खा म्हणत प्रेमाने कुरवाळते आणि कितीही मोठे झालो तरीही चेहऱ्यावर हात फिरवून गोड मुका घेते व भरभरून आशीर्वाद देते ती आज्जी. आता अशी आज्जी बिग बॉसच्या घरात आली म्हणजे थोडं प्रेम, थोडी माया, थोडी चेष्टा आणि कधीतरी धपाटा मिळणारच ना! यासाठी पहा बिग बॉस मराठी फक्त आपल्या कलर्स मराठीवर.