Take a fresh look at your lifestyle.

आता कोण माझे लाड करणार..?; आजोबांच्या निधनानंतर अभिनेत्रीने लिहिली भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हि सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचा फॉलोवर्स वर्ग मोठा आहे. नेहमी छान छान पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारी प्राजक्ता आज मात्र दुखी आहे. कारण तिने तिच्या सगळ्यात जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीला गमावले आहे. नुकतंच तिने आपल्या आजोबांना गमावलं आहे. त्यामुळे ती फार दुःखी- कष्टी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले आजी-आजोबा फारच प्रिय असतात. त्यांच्याशी आपल्या नातवंडाचं एक वेगळंच नातं असतं. कारण हेच आजी-आजोबा प्रत्येक नातवंडांचे पहिले मित्र असतात. असे म्हणत तिने आता कोण माझे लाड करणार..? अशा आशयाची अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हि भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले कि, ‘आजोबा….. आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव… सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं….तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा….माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे… शेवटपर्यंत स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगलात…सगळं आयुष्य कष्टानं जगलात”.

पुढे, ‘वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी, गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा……कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत. पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील….देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री सीरिअल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा…..मन अगदी सुन्न झालंय……परत या आजोबा…..भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा पद्धतीने मोकळं होत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबतच तिचे कलाकार मित्रदेखील दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.