Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस OTT’मध्ये न्यूड योगा?; माजी स्पर्धकाने एका एपिसोडसाठी केली ५० लाखांची मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतामध्ये बिग बॉस हा शो अत्यंत वादग्रस्त आणि गॉसिप मेकर शो म्हणून ओळखला जातो. शिवाय या शोचे चाहतेही मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे हा शो नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बिग बॉस शो संबंधीत मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत कडक असतात हे आपण सारेच जाणतो. पण, डिजिटल प्लॅटफॉर्मवर मात्र या शोच्या नियमांमध्ये बरीच शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी विवेक मिश्रासोबत संपर्क साधून या शोमध्ये न्यूड योगा प्रॅक्टीसच्या आधारे कार्यक्रम मसालेदार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे वृत्त आहे.

अलीकडेच बिग बॉस OTT ची घोषणा झाल्यानंतर हा शो चांगलाच चर्चेत होता. शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर शो चा होस्ट बदलल्यानेदेखील चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान आता बिग बॉसच्या सातव्या पर्वातील माजी स्पर्धक विवेक मिश्रा याला बिग बॉस OTT साठी दिलेल्या ऑफरमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तर, बिग बॉस OTT च्या निर्मात्यांना याबाबत विवेक मिश्राकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला की मला शोच्या ओटीटी आवृत्तीसाठी ऑफर मिळाली होती आणि निर्मात्यांनी मला न्यूड आणि सेमिन्यूड योगाभ्यासाद्वारे कार्यक्रम मसालेदार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले.

 

पुढे विवेक म्हणाला की, मला बिग बॉसच्या ५ जुन्या स्पर्धकांना परत आणायचे आहे. ज्यामुळे कार्यक्रम एका रंजक आणि अनोख्या वळणार येईल. मी आधीही बिग बॉसमध्ये गेलो आहे. पण पुन्हा फक्त न्यूड योगाचा सराव करण्यासाठी मोठ्या रिऍलिटी शोमध्ये जाणं मला योग्य वाटत नाही. मला ते करणं खूप महागात पडू शकतं. शोमध्ये एन्ट्री केल्यानंतर एका एपिसोडसाठी मला ५० लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी विवेकने केली होती. मात्र या संदर्भात व्यतिरिक्त कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे पुढे निर्मात्यांनी काय प्रतिक्रिया दिली? किंवा खरचं या शोमध्ये विवेक मिश्रा न्यूड योगाभ्यास करताना दिसणार का? हे असे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.