सोशल कट्टा । नुसरतने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘हाय स्लीट गाऊन’ परिधान केला होता. या गाऊनचा कट फार वरपर्यंत असल्याने त्यावरून नेटकऱ्यांनी नुसरतला ट्रोल केलं. ‘आज कालचे फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील सांगता येत नाही,’ असं एकाने लिहिलं तर दुसऱ्या एक फॉलोअरने, ‘अरे आपल्या देशात किती गरिबी आली आहे,’ अशी कमेंट केली होती. या ट्रोलिंगला न जुमानता ‘मला जसं वागायचं आहे तसंच मी वागेन’ असं बेधडक उत्तर नुसरत टीकाकारांना दिलं आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नुसरतने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “सध्याची सोशल मीडियावरची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यावरील गोष्टींवर आपलं काहीच नियंत्रण नाही. अनेकजण आपली आवड, नावड त्यावर स्पष्टपणे व्यक्त करतात. ज्यांना एखादी गोष्ट नाही आवडली, त्यांना ते स्पष्टपणे बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे आणि मी प्रत्येकाचा मताचा आदर करते. पण मी ज्याप्रकारचे कपडे परिधान करते, ते एकप्रकारे माझं मतंच आहे की मला हेच करायचंय आणि मी अशीच आहे. माझ्या मताचाही लोकांनी आदर करावा”, अशा सडेतोड शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं.
नुसरतने सोबत ट्रोलिंगचे कमेंट्स वाचत नसल्याचंही सांगितलं. मला जे करायचं आहे ते मी करते, पण ते तुम्हाला आवडलंच पाहिजे असं नाही. तुमची आवड किंवा नावड हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक मत आहे, असं ती पुढे म्हणाली.