Take a fresh look at your lifestyle.

जनहित में जारी! नुसरत भरुचा म्हणतेय .. Condom से शर्म कैसी..?; पहा हटके पोस्टर्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समाजात ज्या विषयांवर उघड भाष्य केले जात नाही त्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नव्या कोऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे. त्यामुळे सध्या अपकमिंग सिनेमांमध्ये बऱ्याच अशा विषयांना हात घातल्याचे दिसते ज्याच्या वाटेलाही लोक जात नाहीत. आता असाच एक विषय घेऊन अभिनेत्री नुसरत भरूचा ‘जनहित में जारी’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन येतेय. सध्या तिच्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. तर हा चित्रपट येत्या १० जून २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात रिलीज होतोय. याविषयी गेल्या काही दिवसांपासून नुसरत सोशल मीडियावर एकापेक्षा एक हटके पोस्ट करताना दिसतेय. या पोस्ट चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

‘जनहित में जारी’ हा आगामी चित्रपट भारताच्या सामाजिक प्रश्नांभोवती घिरट्या घालत एक विशेष संदेश देणारा चित्रपट आहे. दरम्यान ही कथा भारतातील छोट्या गावांवर बेतलेली आहे आणि यामध्ये अभिनेतेत्री नुसरत भरुचा वेगवेगळ्या भूमिकेत दिसते आहे. हा चित्रपट एका तरुण मुलीच्या जीवनाभोवती फिरतो जी सामाजिक निषिद्धांना पार करण्याचा प्रयत्न करतेय आणि मध्यप्रदेशातील एका छोट्या शहरात कंडोम विकायला निघते.

तिला जगाकडून आणि तिच्या स्वत:च्या कुटुंबाकडून कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ओमंग कुमार यांनी खांद्यावर घेतली आहे. तर चित्रपटाची कथा राज शांडिल्य यांनी लिहिली आहे. तसेच थिंकइंक पिक्चर्स, भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि श्री राघव एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली असून, जुही पारेख मेहता या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाच्या विविध पोस्टरची झलक शेअर केली आहे. यातील एका पोस्टार्ध्ये जीन्स परिधान केलेल्या स्त्रीच्या खिशात कंडोम दिसते आहे. सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, आता हि आतली गोष्ट राहिलेली नाही. याशिवाय आणखी एका पोस्टरमध्ये नुसरत दिसतेय आणि तिच्या टीशर्टवर काही लाईन्स लिहिलेल्या आहेत.

यात लिहिलं आहे कि, ‘स्टोकिंग करण्याची लाज बाळगा, कंडोम वापरण्याची नाही’. याशिवाय आणखी एका पोस्टरमध्ये नुसरत दोन वेशात दिसतेय. एक जीन्स टीशर्ट आणि त्यानंतर विवाहित साडीमध्ये. सोबत या व्हिडीओ पोस्टमध्ये लिहिले आहे कि, तुम्ही बोट उठवा मी आवाज उठवेन. अशा हटके पद्धतीने सिनेमाचे प्रमोशन जोरदार चालू आहे आणि हे सर्व पोस्टर चांगले चर्चेतसुद्धा आहेत.