Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बोहल्यावर चढला आणि कनपट्टीवर घोडा लागला’; प्रथमेश परबच्या फोटोमागील रहस्य उघड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dhishkyaoon
0
SHARES
63
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय’ असं म्हणत अभिनेता प्रथमेश परबने एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो अगदी एखाद्या वरासारखा दिसत होता. त्याची हि पोस्ट पाहून तो लग्न करतोय कि काय असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण गुरुवारपर्यंत थांबा असं अभिनेत्याने म्हटलं होत त्यामुळे सगळेच गुरुवारची वाट पाहत होते. शेवटी काल या फोटोमागील रहस्य उघड झालंच. प्रथमेश खऱ्या आयुष्यात नाही पण मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढतो आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

निखळ विनोदांची धमाल आणि प्रेमाची कमाल असे कथानक घेऊन यात उत्तम बॅलन्स करत प्रथमेश परबचा ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर गुरुवारी रिलीज झाले आहे. सगळ्यात आधी शेअर केलेल्या मोशन पोस्टर पाहता पोस्टरमध्ये प्रथमेश परब अगदी मुंडावळ्या बांधून, शेरवानी घालून, हातात वरमाला घेऊन उभा असल्याचे दिसले. पण त्याची बायको काही दिसली नाही. उपास आता अखेर गुरुवारी रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये गांगरलेला प्रथमेश आणि नववधूच्या हातात बंदूक पहायला मिळतेय. इतकंच काय तिने हि बंदूक प्रथमेशच्याच कनपट्टीवर धरली आहे. आहे ना धक्कादायक..

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

या मोशन पोस्टरवरून चित्रपटाचे कथानक कायतरी वेगळाच असणार हे समजत आहे. या पोस्टरमध्ये प्रथमेशसोबत अहमदसुद्धा दिसतोय आणि त्याच्याही गळयात हार आहे. आता हे काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर १० फेब्रुवारी २०२३ ची वाट पाहावी लागेल. कारण हा चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होतोय. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी ‘ढिशक्यांव’चे दिग्दर्शन केले आहे. तर महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मिती केली असून एव्हीके एंटरटेनमेंटची प्रस्तुती आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे यांची आहे. तर चित्रपटात प्रथमेश परब, संदीप पाठक, अहमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी हे कलाकार दिसणार आहेत.

Tags: Instagram PostMotion PosterPrathamesh ParabUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group