Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पुन्हा तुझ्याच प्रेमात पडण्यासाठी..’; ‘ऑटोग्राफ’ घेऊन येतोय समर- ज्युलियाची जपलेली लव्ह स्टोरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Autograph
0
SHARES
450
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्यात प्रत्येकाला किमान एकदातरी खरं प्रेम होतंच. जे विसरणं किंवा डावलणं खरंच शक्य होत नाही. ते आपण मरेपर्यंत असतं. आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडलेलं आपणच दडवलेलं. कुणी अलगद येऊन आयुष्यात रंग भरतं आणि ते रंग आयुष्यभर जपावेसे वाटतात. आजकाल सोशल मीडियावर आपण रोज कित्येकांच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या क्षणांच्या इंस्टा स्टोरी पाहत असतो. त्या तर २४ तासाने निघून जातात. पण आठवणी..? त्या तर कायमस्वरूपी कोरल्या जातात. अशीच एक जपून ठेवलेली लव्ह स्टोरी घेऊन येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘ऑटोग्राफ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. यातील भूमिकांचे पोस्टर प्रदर्शित झाले आहेत जे लक्ष वेधून घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आणि उर्मिला कानिटकर अत्यंत महत्वाच्या भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहेत. प्रेमाची एक अबोल भाषा घेऊन आणि प्रेमाचा हळुवार स्पर्श देणारी हि कथा आहे. या चित्रपटात अंकुश समर हि भूमिका साकारतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

या भूमिकेचे पोस्टर रिलीज झाले असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काही जपून ठेवलेल्या आठवणी नव्याने शेअर करायला येतोय. तुझा समर!’ तर या चित्रपटात अमृता खानविलकर समरची प्रियसी ज्युलियाची भूमिका साकारते आहे. अमृताच्या भूमिकेचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. या पोस्टरसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पुन्हा तुझ्याच प्रेमात पडण्यासाठी आयुष्यभर आपल्या आठवणी जपून ठेवल्यात..तुझीच ज्युलिया’.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

अद्याप उर्मिलाच्या भूमिकेचे पोस्टर रिलीज झाले नसले तरी अंकुश आणि अमृता म्हणजेच समर आणि ज्युलियाचे रोमँटिक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘चोवीस तासांत Disappear होतात त्या Insta Stories.. जपून ठेवलेल्या असतात त्या LOVESTORIES ! समर ❤️ ज्युलिया’.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

या चित्रपटाचे शीर्षक आणि त्याची टॅगलाईन फारच आकर्षक आहे. ‘ऑटोग्राफ- जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी’ हे शीर्षक वाचल्यानंतर एक अनामिक ओढ जाणवत असेल.. तर समजून जा तुम्हीही आयुष्यात खरं प्रेम केलंय. आता चित्रपट प्रेम करायला शिकवणार कि निभवायला हे तर तो प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

Tags: Amruta KhanvilkarAnkush ChoudhariAutographUpcoming Marathi MovieViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group