Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई..?; झी मराठीच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा ग्रीन सिग्नल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aga Aga Sunbai Kay Mhnta Sasubai
0
SHARES
381
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जर तुम्ही तुमच्या प्रियसीसोबत लग्न केलात तर आईला ती आवडेलंच किंवा आईचं आणि तीच पटलेचं याची काय गॅरंटी..? मग अशा वेळी सासूची आई आणि सुनेची लेक व्हायला जरासा वेळ लागतोच. पण हा वेळ एका मजेशीर गोष्टीत बदलू लागला कि जास्त मजा येते. कधीतरी खोड्या, कधीतरी काड्या करून हे नातं थोडं थोडं फुलतं. कुणी चुकलं तर दुसऱ्याने सावरायचं, एकाने पसारा घातला तर दुसऱ्याने आवरायचं असं हे आंबट गोड नातं असतं. असच एक खट्याळ सासू आणि नाटाळ सुनेची गोष्ट घेऊन लवकरच झी मराठी एक मालिका घेऊन येत आहे. ज्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

खोडकर सुनेच्या खोड्या आणि सुनेवर कुरघोडी करणाऱ्या सासूची गोष्ट घेऊन ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ हि मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आजच्या आधुनिक काळातलं सासू सुनेचं नातं कसंही असो पण कदाचित हि मालिका अनेक नाती बहरायला आणि फुलायला मदत करेल. कधी भांडतात, कधी रुसतात पण एकीमेकींसोबतचं नांदतात अशा या सासू सुनेला भेटायला तुम्ही उत्सुक आहात ना..? त्यांचा हा धमाल प्रवास जणू तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना. या मालिकेत सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी तर सुनेच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

हि मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता झी मराठी या वाहिनीवर प्रसारित आहे. अद्याप या मालिकेतील इतर पात्र कोण असणार आहेत..? त्यांच्या भूमिकेत कोण कलाकार असतील?

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र व्हायरल प्रोमो व्हिडिओतून सासू- सुनेच्या छोट्याश्या भांडणाचा गोड प्रसंग दाखवला आहे. या मालिकेच्या माध्यामातून घराघरातील सासू सुना एकमेकींना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला आरशात पाहतील आणि एकमेकींसोबत असलेल्या नात्याची वीण घट्ट करतील अशी आशा आहे.

Tags: Sukanya MoneSwanandi TikekarUpcoming Marathi SerialViral Promozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group