Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ईशा केसकर साकारतेय भोजनेची सरला; सोशल मीडियावर टिझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sarala Ek Koti
0
SHARES
4.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॉमेडी युवा किंग ओंकार भोजनेचा एक लूक प्रचंड चर्चेत आला होता. यामध्ये ओंकार एखाद्या जुगाऱ्यासारखा दिसत होता. हा लूक त्याच्या आगामी चित्रपट ‘सरला एक कोटी’मधला असल्याचे समोर आले आणि हा चित्रपट नक्की काय असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये फक्त ओंकार असल्यामुळे चित्रपटाचे कथानक काय..? चित्रपटात बाकी असणार कोण..? याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. तर नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे आणि यातून भोजनेची सरला आहे कोण ते समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Onkar Bhojane (@onkar_bhojane_)

‘सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या शिर्षकानेच मुळात प्रचंड लक्ष वेधून घेतलं आहे. नावावरून हा चित्रपट काय असेल आणि कसा असेल हे अजिबात कुणी सांगू शकलं नाही. पण आज टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचे कथानक शीर्षकासारखेच सरलाभोवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील सरला हि ओंकार भोजने साकारत असलेल्या भिकाची पत्नी आहे आणि या भूमिकेत ईशा केसकर आपल्या समोर येते आहे. ‘देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साता जन्माचे वचन दिलंय’ अशी टॅगलाईन असलेलं सरलाचं पोस्टर अलीकडेच रिलीज झालं आहे. यानंतर आज चित्रपटाच्या टीझरने कथानकाबाबत असलेली उत्सुकता वाढवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

गावाकडच्या स्वयंपाकघरात एका करारनाम्यावर पाठमोरी बसलेली ईशा असं ‘सरला’चं पोस्टर आहे. हा चित्रपट ‘सत्य घटनांवरून प्रेरीत’ असल्याचे शीर्षकाची टॅगलाईन सांगत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरनुसार या चित्रपटात भिकाला जुगाराचं वेड असल्याचं दाखवलं आहे. आपल्यापेक्षा उजवी आणि दिसायला वरचढ अशी सरला त्याची पत्नी होते आणि अख्ख्या गावाची नजर तिच्यावर भिरभरु लागते. पत्त्याच्या डावात भिकाला दावावर काय लावायचे असा प्रश्न पडला आणि…. खेळता खेळता डाव असा रंगला, जोकर असूनही तो राणी हरला! साताजन्माच्या गाठीला विसरून, भिकाने पैजेवर लावली सरला! हा चित्रपट येत्या २० जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. नेमकं हे कथानक काय सांगू पाहतंय हे तर चित्रपट पहालं तेव्हाच कळेल.

Tags: Instagram PostIsha KeskarOfficial TeaserOnkar BhojaneSarala Ek KotiViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group