Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या ‘गोदावरी’चा ट्रेलर प्रदर्शित; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Godavari
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटातील ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसते. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण यात दाखवले आहे. ‘गोदावरी’ नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा असून तिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे. तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसते. नदीच तर आहे, असे मानणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे..? हे चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल.

या चित्रपटाविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘मराठी चित्रपटांचा आशय आणि दर्जा हा नेहमीच जागतिक दर्जाचा राहिला आहे आणि याच मांदियाळीतला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या सर्वांकरता ही निश्चितच अभिमानाची गोष्ट अशी आहे की, प्रदर्शनापूर्वीच ‘गोदावरी’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून अनेक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत. नदीशी आपलं नातं अत्यंत जुनं आहे. संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा थेट संबंध नदीशी जोडलेला आहे. दुर्दैवानं मधल्या काळात आपण नदीचं महत्व विसरलो, त्यामुळे नद्याही प्रदूषित झाल्या आणि आपले विचार, संस्कारही प्रदूषित झालेत. ते बदलणं खूप गरजेचं आहे. ‘गोदावरी’ नदीभोवती एका व्यक्तीची कहाणी गुंफून आणि त्यातून मोठा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे हे काम केलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. यानिमित्तानं नदीशी असलेलं आपलं नातं पुनर्जीवित करता येईल. हा असा विषय आहे ज्यात अंधश्रद्धा नसून केवळ श्रद्धा आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीपर्यंत पोहोचणं, हा मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. मी हा सिनेमा आवर्जून पाहणार असून ‘गोदावरी’च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा!’

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले कि, ‘राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता ‘गोदावरी’ आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा ‘गोदावरी’ संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे.’

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

यशोवयी ‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणाले कि, ’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण ‘गोदावरी’ हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. आणि आज महत्वाचं म्हणजे आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. आणि आता चित्रपट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला विशेष आनंद आहे. मला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील.’

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणी विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता. त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपली मोहोर उमटवली आहे.

Tags: Devendra FadanvisGodavariInstagram PostJitendra JoshiTrailer ReleasedUpcoming Marathi MovieYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group