Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भरत जाधव आणि वैभव मांगलेंची कमाल जोडी घेऊन आलीये धमाल कॉमेडी; ‘धोंडी- चंप्या’चा ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 3, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dhondi Champya
0
SHARES
4.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी- आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे.

आपण एका मुला मुलीची प्रेम कथा तर नेहमीच बघत आलो आहे, परंतु ही कहाणी एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघामध्ये कसलं तरी शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचे खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबर सिनेमा गृहात जाऊन चित्रपट बघावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by Reliance Entertainment (@reliance.entertainment)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ‘प्रेक्षकांना विनोदी चित्रपट आवडतात. ही एक धमाकेदार कहाणी आहे. निव्वळ मनोरंजन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत पाहावा असा आहे. धोंडी आणि चंप्याला एकत्र आणताना उडणारी धमाल यात पाहायला मिळणार असून प्रेमकथा आणि विनोद हे दोन्ही जॉनर अनुभवायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत.’

View this post on Instagram

A post shared by Reliance Entertainment (@reliance.entertainment)

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी ‘धोंडी चंप्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात भेटायला येणार आहेत.

Tags: Bharat JadhavDhondi ChampyaOfficial TrailerRelVaibhav Mangale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group