Take a fresh look at your lifestyle.

‘ओ गरीब दीदी, माझ्याकडून कपडे घेऊन जा’; उर्फी जावेदचा ख्रिसमस लूक झाला ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटीची एक्स स्पर्धक उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन अंदाजमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती कधी कुठे आणि कोणत्या लूकमध्ये दिसेल याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. विशेष म्हणजे उर्फी जावेद स्वतः स्वतःचे ड्रेस डिझाईन करते आणि सतत लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत असते. तिच्या कलरफुल अतरंगी फॅशन अंदाजमुळे आणि चित्रविचित्र लूकमुळे ती सतत माध्यमंध्येही चर्चेत असते. ती नेहमीच स्वतःचा लूक बोल्ड आणि आयकॉनिक असेल याकडे लक्ष देते. शिवाय ट्रोल होउदे नाहीतर काहीही होउदे. उर्फी मात्र तिचा आत्मविश्वास ढळू देत नाही. अश्याच एका नव्या लूकमुळे उर्फी पुन्हा एकदा ट्रॉल होताना दिसतेय.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध ड्रेसमधील फोटो शेअर करत असते आणि हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. तिचे कपडे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते आणि अनेकांना हसूदेखील येते. कारण जे कपडे कधीच कोणी घातलेले नाही आणि घालेल असे वाटत नाही असे कपडे उर्फी तयारही करते आणि परिधानसुद्धा करते. यानंतर नुकताच तिचा ख्रिसमस लूक समोर आला आहे आणि या लूकने सगळीकडे हशा पिकवला आहे. याचे कारण म्हणजे तिची अतरंगी स्टाईल. तिच्या या नव्या लूकवर नेटकऱ्यांनी ट्रोलिंगच्या उद्देशाने कमेंट्स केल्या आहेत.

या फोटोमध्ये उर्फी जावेदने थोडा अतरंगी लूक केला आहे. यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर या व्हिडिओमध्ये उर्फीचा ड्रेस असा डिझाइन केलेला दिसतोय ज्यात तिचा ड्रेस जरा जास्तच फाटलेला आहे का काय असे वाटतेय. इतकेच नाही तर तिचा ड्रेस फाटला आहे यावर नेटकऱ्यांनी मात्र सहमती दिली आहे. तिच्या ड्रेसचे लटकलेले कापड हेच तिच्या नव्या ट्रोलिंगचे कारण आहे. या ड्रेसवर तिने पोनी टेल बांधली असून, त्यावर मिनिमम मेकअप केला आहे.

या फोटोवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी लिहिले ‘ओ गरीब दीदी रेहम करो, तर अन्य एकाने लिहिले, माझ्याकडून कपडे घेऊन जा पण असले कपडे घालू नको. याशिवाय आणखी एकाने लिहिले, कुत्रा मागे लागलेला का काय?, तर आणखी एका नेटकऱ्याने तिची खिल्लीओ उडवत लिहिले, कुणाला सलवार मध्ये नाडीची गरज असेल तर उर्फी जावेदशी संपर्क साधा.