Take a fresh look at your lifestyle.

राधिका आपटेने शेअर केल्या जुन्या आठवणी; बाॅलिवुड अभिनेता म्हणाला Sexy दिसतेस..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाच्या जोरावर विविध धाटणीच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका आपटे ही नेहमीच चर्चेत असते. कधी हटके फोटो शूट तर कधी आगामी प्रोजेक्ट्समूळे सोशल मीडियावर राधिकाच्या नेहमीच चर्चा असते. हंटर चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली राधिका हि नेहमीच अल्लग भूमिका आणि वेगळे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकताच एक वेगळा लूक इन्स्टा वर शेअर केलाय आणि तो पाहून तिच्या चाहत्यांसह बॉलिवूड अभिनेता विजय वर्मादेखील भारावून गेलाय. त्याची कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री राधिका आपटे हिने स्टेट ऑफ माईंड (मनाची अवस्था) असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. राधिकाने हा फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. राधिकाचा हा लूक आणि फोटो पार्च्ड चित्रपटातील आहे. हा चित्रपट ४ स्त्रियांच्या जीवनावर आधारित होता . जो २०१५ साली रिलीज झाला. या फोटोमध्ये तिचा लूक मोहक नसला तरीही लक्षवेधी नक्कीच आहे. विस्कटलेले केस, मळलेले कपडे, गळ्यात पेंडन्ट, कानात झुमके , डोळ्यात काजळ आणि गळ्यावर पारंपरिक गोंदण. असा राधिकाचा अनोखा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यातील बॉलिवूड अभिनेता विजय वर्माची कमेंट चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा याने कमेंट करताना Sexy डाकू अशी कमेंट केली आहे. आता अशा लूकमध्ये ती सेक्सी दिसतेय असं बोलणारा हा एकटा नव्हे तर इतर अनेक नेटकऱ्यांनी तिचा लूक सेक्सी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय काहींनी थट्टा करीत मॅडम हा तुमचा भाऊ आहे का..? असेही विचारले आहे. राधिका आपटे हि एक भारतीय अभिनेत्री असून तिने मराठी, हिंदीसह काही तामिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने वाह लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातून छोट्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर तिने अनेक चित्रपटात अव्वल भूमिका साकारल्या.