Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता? ओम- स्वीटूचं लग्न झालं? म्हणजे मालिका संपणार?; व्हायरल फोटोंवर प्रश्नांचा भडीमार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होत. हि मालिका लोकांसाठी इतकी जवळची झाली कि मालिकेतील नायक नायिकेच्या डोळ्यात पाणी आलं तर उभा प्रेक्षकवर्ग भावुक होत होता. यानंतर मालिकेने अनेकदा उत्कंठावर्धक वळणे घेतली आणि यानंतर मालिकेने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळतेय. या मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून विविध घडामोडी वेग घेताना दिसत आहेत.

मालिकेत नुकतेच मालविका आणि मोहितचे कारस्थान उघड होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर तिथेच मोहितने स्वीटूला घटस्फोट दिल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अचानक स्वीटूने तडक फडकी निर्णय घेत ओमचा निरोप घेतल्याचे दिसले. पण आता सोशल मीडियावर ओम स्वीटूच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षक एकदम भांबरून गेले आहेत.

अजूनतरी मालिका पूर्णत्वास गेलेली नाही त्यामुळे काय चाललंय कायच्या मारी? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. कारण एकीकडे तर स्वीटूने ओमला वेगळंच होऊ सांगत स्वतःचा मार्ग निवडलेला दाखवला. तर दुसरीकडे ६ महिन्यानंतर मालिका पुढे ढकलून ओम स्वीटूची प्रेमकहाणी पूर्ण होणार अश्या हुलकावण्या देत आहेत. त्यामुळे खर्च ही लव्हस्टोरी पुढे जाणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

मुख्य म्हणजे आज ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे फोटो पाहून अनेक प्रेक्षकांना हायसे वाटले आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे समोर येत आहे. प्रसारित भागांमध्ये ओम स्वीटूला आपलेसे करायला गावी जाताना दाखवले आहे. यातील एका प्रोमोमध्ये ओम स्वीटूला भेटायला गावी जातो आणि दोघांची लव्हस्टोरी पुन्हा पहायला मिळेल याचे संकेत दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमध्ये ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. मालिकेत अचानक आलेला हा ट्विस्ट खरंतर गोंधळून टाकणारा आहे. कारण या या क्षणाची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट पाहिली आहे. ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा सोहळा मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. मात्र त्यांच्या लग्नात मालविकासुद्धा उपस्थित आहे हे पाहून सर्वांनाच आनंदाचे क्षण परत आले आहेत असेच वाटू लागले आहे. तर दुसरीकडे येऊ कशी तशी मी नांदायला ही लाडकी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे.